धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या आणि दरोड्यात मोठी वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन संशयित चोरट्याना दरोडा व लुटीच्या मालासह अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात असताना दि. 11.04.2024 रोजी पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे कळंब गुरनं 168/2024 कलम 394 हा गुन्हा अमोल नाना काळे रा. कनेरवाडी पाटी यांने व त्याचे साथीदार यांनी केला आहे. व तो सध्या एका झाडाखली लपून बसला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लगलीच कनेरवाडी येथे जावून आरोपीचा शोध घेत असताना एका इसम झाडाखाली बसलेले पथकास पाहून पळून जत असताना पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव अमोल नाना काळे, वय 23 वर्षे रा. कन्हेरवाडी पाटी असे सागिंतले .
त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मी व माझे चार साथीदार यांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावर विशेष पथकाने आरोपी नामे- 1)अमोल नाना काळे, वय 23 वर्षे, 2) राहुल कालीदास काळे, वय 22 वर्षे, 3) अतुल कालीदास काळे तिघे रा. कन्हेरवाडी पाटी ता. कळंब जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम, दोन गॅस टाक्या,मोटरसायकल, 60 लि डिझेल असा एकुण 81,080₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याची खात्री करता ती पोलीस ठाणे कळंब गुरंन 168/2024, कलम 394, 34, गुरनं 140/2024, कलम 395, वाशी पोलीस ठाणे गुरनं 70/2024 कलम 379, गुरनं102/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. तसेच आरोपी अमोल काळे, राहुल काळे हे कळंब पोलीस ठाणे गुरनं 426/2023 कलम 395, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण गुरनं 32/2024 कलम 392 मध्ये पाहिजे आरोपी आहेत. तसेच पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद तीन आरोपीस चोरीच्या मालासह कळंब पोलीसांच्या ताब्यात दिले.
तेरा वर्षापासून फरार असलेला आरोपी कळंब पोलीसांनी केला जेरबंद
कळंब पोलीस ठाणेच्या प्रभारी पोलीस निरीक्षक रवि सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब येथील गुरनं 08/2011 कलम 392, 34 भादवी मधील पाहीजे आरोपी हा त्याचे गावी आहे अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस ठाणे कळंब येथील पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून आरोपी नामे- सुर्यकांत रामकिसन गंगणे वय 43 वर्षे, रा. कुत्तरविहीर अंबाजोगाई जि. बिड यास गुन्हा घडल्यापासून तब्बल 13 वर्षाने दि. 11.04.2024 रोजी अथक प्रयत्न करुन मोठ्या शिथापिने ताब्यात घेवून त्याचे नावाची व पत्यांची तसेच न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्राची खात्री करुन त्यास दिनांक 12.04.2024 रोजी अटक करुन जेरबंद करण्यात आले आहे.