धाराशिव – धाराशिव शहर, आनंदनगर , स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या आशीर्वादामुळे शहरात कल्याण मटका जोरात सुरु आहे. वर्षातून एकदा किरकोळ कारवाई केली जाते, पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. सात पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या मटका एजटांना हद्दपार न करता, त्यांच्याकडून हप्ता वाढवून संरक्षण दिले जाते. त्यामुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत.
धाराशिव ते तुळजापूर रोड लगत एम.एस.ई. बी च्या गेट समोरील बाजूस पत्र्याचे डब्यात धाराशिव येथे कल्याण मटका नावाचे जुगार खेळत व खेळवीत असणारे इसमांची खात्रीशीर माहिती मिळाल्याने धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, यांनी पोलीस स्टाफसह धाराशिव ते तुळजापूर रोड लगत एम.एस.ई. बी च्या गेट समोरील बाजूस पत्र्याचे डब्यात छापा टाकला असता तेथे कल्याण मटका नावाचे जुगार खेळत असतांना खालील इसम मिळून आले.
1. शकील काशीम तांबोळी, वय 56 वर्षे, रा. सांजावेश गल्ली धाराशिव, 2) प्रशांत सोमनाथ चव्हाण, वय 32 वर्षे, 3) दत्ता श्रीराम गवळी, वय 69 वर्षे, 4) मंगेश उत्तम हुंडे, वय 28 वर्षे, रा. बौध्दनगर धाराशिव, 5) अनिल सुभाष गंदेवाड, वय 25 वर्षे, 6) लहु सोमनाथ दाने, वय 32 वर्षे, 7) सोहेल आयुब आत्तार, वय 23 वर्षे, 8) सुधाकर निवृत्ती पौह, वय 55 वर्षे, 9) इरफान इस्माईल शेख, वय 30 वर्षे रा. पुर्व खाजा नगर धाराशिव . हे सर्व लोक कल्याण मटका जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमुद इसम हे रोख रक्कम व जुगाराचे साहित्यासह एकुण 2,25,670 ₹ स्वत:चे कब्जात बाळगलेले असताना पथकास मिळून आले. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो. ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.