लोहारा : आरोपी नामे- गजेंद्र गोविंद रणखांब, वय 50 वर्षे, 2) ललीता बिभीषण रणखांब, वय 29 वर्षे, 3) बिभीषण बालाजी रणखांब, वय 38 वर्षे रा. तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी मयत नामे- रुपाली दिगंबर दुणगे, वय 25 वर्षे, रा. तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव यांना दि. 28.01.2024 रोजी 11.00 ते 16.00 वा. सु. तोरंबा शिवारातील शेतात कांदे काढण्याच्या कामास बोलावून मयताचा ओढणीने किंवा कशाने तरी गळा आवळून खुन केला.आशा मजकुराच्या मयताचे वडील- दिगंबर शामराव दुणगे, वय 50 तोरंबा, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.29.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लेाहारा पो. ठाणे येथे कलम 302, 34 भा.दं.वि.सं. अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3 (2),(व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
धाराशिव :आरोपी नामे- 1)सुनिल जग्गु पवार, 2) राधा सुनिल पवार दोघे रा. पापनास नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.29.01.2024 रोजी 20.00 वा. सु. जुना बस डेपो येथील दुध डेअरीच्या रोडणे घराकडे जात असताना धाराशिव येथे फिर्यादी नामे- मिना सुनिल पवार, वय 40 वर्षे, रा. पापनास नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु माझ्यावर केस का केली या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मिना पवार यांनी दि.29.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1) शरण कोरे, 2) सुनिल हिंडोळे, 3) बालाजी मोरे तिघे रा. जळकोट ता. तफळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 28.01.2024 रोजी 18.45 वा. सु. एन.एच 65 रोडवरील फुलवाडी टोलनाका येथे बुथ क्र 12 येथे फिर्यादी नामे-महादेव राजकुमार तोग्गी, वय 27 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी टोल नाक्यावर टोल न देता तशेच पुडे जात असताना फिर्यादीने हाक मारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव तोग्गी यांनी दि.29.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.