• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा येडेश्वरी यात्रेत महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

admin by admin
April 4, 2026
in क्राईम
Reading Time: 2 mins read
येरमाळा येडेश्वरी यात्रेत महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत दोन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल रोजी येडेश्वरी यात्रेमध्ये गर्दीच्या ठिकाणी गुन्हे घडू नयेत याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पायी गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला आणि एक इसम चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत आहेत. पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन या तिघांवर पाळत ठेवली आणि ते गर्दीत चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र संशय बळावल्याने त्यांना येरमाळा पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी खालीलप्रमाणे माहिती दिली:

  • अनिल शेषेराव शिंदे (वय ३४ वर्षे)  सुनीता अनिल शिंदे (वय २९ वर्षे)  हिराबाई रमेश शिंदे (वय ४० वर्षे) हे सर्व आरोपी इंदिरानगर, पाथरी (ता. पाथरी, जि. परभणी) येथील रहिवासी आहेत.

  • पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेण्यात आली. यावेळी आरोपी अनिल शिंदे याच्या पँटच्या खिशात ४ वेगवेगळे सोन्याचे मणी आणि मंगळसूत्र मिळून आले.

 

चोरीची पद्धत:

  • येरमाळा-बीड हायवेवर ब्रिज संपल्यावर उजव्या बाजूला रोडलगत यात्रेतील भाविकांना आंघोळीची व्यवस्था केली होती.

  • सकाळी ७.०० ते ९.०० च्या दरम्यान महिला भाविक तेथे आंघोळ करत असताना सोबतच्या दोन आरोपी महिला गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दागिने चोरायच्या.

  • चोरलेले हे दागिने त्या महिला आरोपी अनिल शिंदे याच्याकडे आणून द्यायच्या.

  • पोलिसांनी या आरोपींच्या अंगझडतीतून एकूण १,३१,००० रुपये किमतीचे ४ सोन्याचे मणी-मंगळसूत्र जप्त केले आहेत.

सदरची धडक कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईतील पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक. विनोद इज्जपवार, सपोनि  सचिन खटके, तसेच पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोह शोभा बांगर, महेबुब अरब आणि रोहीत दंडनाईक यांचा सहभाग होता.

 

Previous Post

शाळेची वही आणली नाही म्हणून १३ वर्षीय विद्यार्थ्याला लाकडी काठीने बेदम मारहाण

Next Post

मुरुम : ५० हजारांच्या खंडणीसाठी वृद्धाला मारहाण; दीड तोळ्याची साखळी लुटली

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

मुरुम : ५० हजारांच्या खंडणीसाठी वृद्धाला मारहाण; दीड तोळ्याची साखळी लुटली

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!