• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येडेश्वरी यात्रेत भाविकांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
April 12, 2026
in क्राईम
Reading Time: 2 mins read
येडेश्वरी यात्रेत भाविकांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेत भाविकांना अडवून लुटणाऱ्या आणि वाहने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत येरमाळा येथे येडेश्वरी यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यान काही अज्ञातांनी यात्रेकरूंना रस्त्यात अडवून लुटल्याच्या, तसेच त्यांची वाहने (मोटारसायकली) चोरल्याच्या घटना घडल्या होत्या व त्या अनुषंगाने अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे अतिसंवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचे असल्याने धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते

या तपासादरम्यान, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ११ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि त्यांच्या पथकाने मोहा आणि आळणी येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने यात्रेकरूंना रस्त्यात अडवून लुटल्याची व मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यांनी आळणी शिवार तसेच कुसळंब-धानोरा रोड परिसरात चोऱ्या केल्याचे आणि येरमाळा शहरातून दोन ठिकाणांहून दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी खालील तीन आरोपींना अटक केली आहे:

  • आनंद शामराव पवार (वय २७ वर्षे, रा. जिओ पेट्रोल पंपाचे पाठीमागे, आळणी, ता. जि. धाराशिव)

  • शुभम शामराव पवार (वय २५ वर्षे, रा. जिओ पेट्रोल पंपाचे पाठीमागे, आळणी, ता. जि. धाराशिव)

  • बबन शहाजी काळे (वय २८ वर्षे, रा. मोहा, ता. कळंब)

या आरोपींचा आणखी एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून दोन सोन्याचे डोरले, एक मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जबरी चोरीचे दोन आणि दुचाकी चोरीचे दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी या आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकातील पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, चापोह नागनाथ गुरव यांनी केली आहे.

 

Previous Post

‘ऑपरेशन टायगर’चा धाराशिवमध्ये फुसका बार! शिंदेंच्या कार्यक्रमाकडे ओमराजेंची पाठ; ठाकरे गटाचा खोचक टोला

Next Post

जमीन खरेदीच्या बहाण्याने तब्बल २ कोटी २० लाखांची फसवणूक; येरमाळा पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जमीन खरेदीच्या बहाण्याने तब्बल २ कोटी २० लाखांची फसवणूक; येरमाळा पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026
मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026

Recent Posts

  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
  • मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी
  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!