धाराशिव – मुरुम आणि लोहारा पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी प्रकरणी दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील मागील २७ वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
घरफोडीतील आरोपी कुंभकर्ण उर्फ कुमार अब्दुल्ला पवार ( वय 55 वर्षे ) रा. जळकोटवाडी हल्ली मु. मोमीन नगर नगर ( सोलापूर) हा मागील २७ वर्षापासून फरार होता. दिनांक २१ नोव्हेंबर रोजी या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडून त्यास पोलीस ठाणे मुरूम येथे हजर केले.
आरोपी कुंभकर्ण उर्फ कुमार अब्दुल्ला पवार याच्यावर पोलीस ठाणे मुरूम येथे गुरनं 9/1994 कलम 457,397 भादंवि आणि पोलीस ठाणे लोहारा येथे गुरनं 50/1997 कलम 457,380 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी फरार होता. २७ वर्षानंतर पोलिसाना जाग आली आणि त्यास गजाआड केले.
ही कार्यवाही पोनि वासुदेव मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी शैलेश पवार, पोहेका/1166 हुसेन सय्यद , पोना/1569 अमोल चव्हाण , पोहेका/1248 अरब.यांनी केली.