धाराशिव : सरकारी वीज फुकट मिळतेय म्हणल्यावर, कुणालाही मोह येईलच! पण सरकारी ऑफिसमध्ये खासगी इलेक्ट्रिक बाईक चार्ज करणं कायद्याला धरून नाही. मात्र, धाराशिव पोलीस मुख्यालयातील एका महिला पोलीस उपनिरीक्षक बाईंना हे नियम वगैरे झेपले नसावेत. त्यांनी चक्क वायरलेस ऑफिसच्या कनेक्शनवर आपली इलेक्ट्रिक बाईक रोज चार्ज करण्याचा ‘सरकारी उपक्रम’ सुरू केला आहे!
आता सरकारी गाड्या चार्ज करणं समजू शकतं, पण खासगी बाईकला सरकारी वीज मिळाली म्हणजे थोडं जास्तच सरकारी प्रेम झालं नाही का? हा व्हिडीओ पाहा – धाराशिव LIVE पुराव्याशिवाय बातम्या देत नाही, हे माहिती आहे ना?
पण जरा थांबा! धाराशिव पोलीस मुख्यालयातील गॅस गोडावून शेजारी असलेलं वायरलेस ऑफिस वीज चोरीत गुंतलेलं आहे, अशी चर्चा रंगली आहे. म्हणजे मॅडमने वाहत्या पाण्यात हात धुतला तर बिघडलं कुठे?
“सरकारी चार्जिंग स्टेशन” उघडायचा विचार आहे का?”
आता बाईक चार्जिंग ही एक वेळ समजू, पण उद्या फ्रिज, मोबाईल, मिक्सर, किंवा एखादा गिझरही लावला तर? मग हे वायरलेस ऑफिस ‘मिनी चार्जिंग स्टेशन’ म्हणून घोषित करायला हरकत नाही.
यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, मॅडमला ‘चार्जशीट’ मिळते की अजून ‘चार्जिंग’ सुरूच राहतं, हे पाहणं मजेदार ठरेल!
धाराशिव लाइव्हच्या युट्युब चॅनलवर व्हिडीओ पाहा