धाराशिव – शिंगोली येथे एका व्यक्तीवर फावड्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रकाश भाउ लोहार (वय ४६, रा. शिंगोली बसस्थानक) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मेघदुत हॉटेलच्या बाजूला असलेल्या विटभट्टीजवळ ही घटना घडली. बप्पा पाडोळे (रा. शिंगोली) या आरोपीने प्रकाश लोहार यांना कोणतेही कारण नसताना फावड्याने मारहाण केली. या हल्ल्यात लोहार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रकाश लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी बप्पा पाडोळे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
कार्ला येथे मारहाणीची घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
तुळजापूर – कार्ला येथे मागील भांडणाचे कारणावरून एका ३५ वर्षीय व्यक्तीला मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी दशरथ देवकर (वय ३५, रा. कार्ला) यांना हनुमंत सत्यवान कोळेकर, रंजना हनुमंत कोळेकर, श्रीमंत सत्यवान कोळेकर आणि सत्यवान नारायण कोळेकर (सर्व रा. कार्ला) या चौघांनी सोमवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मारहाण केली. मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी देवकर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी लहान बॅटेनेही हल्ला करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी देवकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर धनाजी देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.