धाराशिव येथे मागील भांडणाचा वचपा काढत चौघांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 18 सप्टेंबर 2024 रोजी घडली असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे- कुलदिप कदम उर्फ पप्पु, अमोल लुगंसे, सुनिल अंबेकर प्रविण लुगंसे रा. समता नगर ता.जि. धाराशिव यांनी दि. 18.09.2024 रोजी 17.00 वा. सु. नंबर शळेसमोरील पंटागणात धाराशिव येथे फिर्यादी नामे-बाबासाहेब राजाभाउ साठे, वय 47 वर्षे, रा. आळणी ता.ह.मु. समता कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील झालेले भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
याप्रकरणी फिर्यादी नामे-बाबासाहेब साठे यांनी दि.21.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे