तुळजापूर येथे रस्त्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी सहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हाडको तुळजापूर येथे राजेंद्र माने (वय ५३) यांना आरोपींनी रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत लाथाबुक्क्यांसह विटांचा आणि लाकडी दांड्यांचा वापर करण्यात आला. यात माने हे जखमी झाले. वाद सोडवण्यासाठी आलेल्या माने यांच्या पत्नीला देखील आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, त्यांनी लाईटचा बोर्ड आणि पाण्याचे पाईप फोडून नुकसान केले.
या घटनेनंतर राजेंद्र माने यांनी २१ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सतिष सरडे, जयश्री सरडे, श्रद्धा सरडे, शंडु सरडे, भाग्यश्री इंगळे, किरण इंगळे आणि विशाल छत्रे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2),189(2), 190, 324(4)(5), 329(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.