धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी लागू करण्यात आलेली संचारबंदी एकाच दिवसात उठवण्यात आली, पण जमावबंदी लागू करण्यात आली असून, याबाबतचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी काढला आहे.
धाराशिव जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन व आगामी काळात साजरे होणारे सण/ उत्सव व कार्यक्रम तसेच विविध पक्ष संघटना यांचे वतीने त्यांचे मागणी संदर्भात धरणे, मोर्चे, बंद, संप रस्ता रोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत. धाराशिव जिल्ह्यात दिपावली सणानिमीत्त दि. 09.11.2023 ते 15.11.2023 पावेतो वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा, भाउबीज हे सण/उत्सव साजरा होणार आहे. तसेच दि.27.11.2023 रोजी गुरुनानक जंयती साजरी होणार आहे.
तसेच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष/ संघटना यांचे कडून आंदोनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषगांने धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी. यासाठी मा. पोलीस अधिक्षक धाराशिव यांनी दि. 31.10.2023 रोजी जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांना प्रस्ताव देवून दि.01.11.2023 ते दि. 30.11.2023 जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी होण्यास विनंती केली होती.
उपरोक्त अहवालावरुन जिल्हादंडाधिकारी, धाराशिव यांनी आज दि. 01.11.2023 रोजी आदेश क्र.2023/ उपचिटणीस/एमएजी-3/कावी-957 नुसार दि.01.11.2023 रोजी 17.00 वाजेपासून दि. 30.11.2023 (दोन्ही दिवस धरुन) जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे
हे आहेत नियम