धाराशिव नगरपरिषदेच्या हद्दीतील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेल्या गुरुवर्य के. टी. पाटील यांच्या पुतळ्यावर आज ६ ऑगस्ट रोजी हातोडा पडणार होता. परंतु, पुरेसा पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने नगर परिषदेने ही कार्यवाही पुढे ढकलली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने हा पुतळा अनधिकृत असल्याचे निष्कर्ष काढल्यानंतर, पुतळा हटवण्याचे आदेश नगर परिषदेला देण्यात आले होते. कार्यवाहीच्या संवेदनशीलतेमुळे, नगरपरिषदेने विशेष तयारी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात जमावबंदी लागू केली होती.
मात्र, आनंदनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी राज ठाकरे यांचा धाराशिव दौऱ्याचे कारण पुढे देत शहरातील तणावामुळे पुरेसा पोलीस बंदोबस्त देता येणार नाही, असे कळवले. यामुळे पालिकेला कार्यवाही पुढे ढकलावी लागली आहे.
पोलीस प्रशासनाला आठ दिवसांपूर्वी पत्र दिले असताना, ऐनवेळी पोलिसांनी हात झटकले आहेत, पोलिसांबरोबर आण्णाची “अर्थपूर्ण” बोलणी झाल्याचीही चर्चा सुरु आहे.