धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तपासात पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने या प्रकरणाचा तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. परंतु तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्यावर कोणती कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह तीन जणांवर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी बोर्डे आणि पवार हे तीन महिन्यापासून मोकाट आहेत.
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर निष्क्रिय ठरले होते. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर हा प्रकरणाचा तपास बांगर यांच्याकडून काढून डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.आरोपी आणि पोलीस यांच्यात ‘अर्थपूर्ण’ बोलणी झाल्याने आनंदनगर पोलीस आरोपीना अटक करण्याचे धाडस करीत नव्हते.
धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असून, तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी काही प्रश्न विचारले आहेत. यामुळे निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची पाचावर धारण बसली आहे.
धाराशिव नगर पालिका अंतर्गत २७ कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणातील गुन्ह्यातील तपासात आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची पोलीस मुख्यालयात लवकरच उचलबांगडी होणार असून, विधान परिषदेत हा विषय गाजल्यास बांगर निलंबित होण्याची शक्यता आहे.