• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन

फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पथक नियुक्त

admin by admin
November 23, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा
0
SHARES
617
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथक ( एसआयटी ) नेमणूक करण्यात आले असून डीवायएसपी स्वप्नील राठोड यांना मदत करण्यासाठी दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हा आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आज ( गुरुवारी ) काढला आहे.

धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तपासात पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने या प्रकरणाचा तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आता यासाठी विशेष तपास पथक ( एसआयटी ) नेमणूक करण्यात आले असून डीवायएसपी स्वप्नील राठोड यांना मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह तीन जणांवर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी बोर्डे आणि पवार हे तीन महिन्यापासून मोकाट आहेत.

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर निष्क्रिय ठरले होते. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर हा प्रकरणाचा तपास बांगर यांच्याकडून काढून डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.आरोपी आणि पोलीस यांच्यात ‘अर्थपूर्ण’ बोलणी झाल्याने आनंदनगर पोलीस आरोपीना अटक करण्याचे धाडस करीत नव्हते. याप्रकरणी बांगर यांची पोलीस मुख्यालयात लवकरच उचलबांगडी होणार आहे.

धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित घोटाळा प्रकरणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असून, तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी काही प्रश्न विचारले आहेत. यामुळे निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची पाचावर धारण बसली आहे.

काय आहे प्रकरण ?

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची उचलबांगडी होणार …

Next Post

धाराशिव शहरात गुटख्याची राजरोस विक्री

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव शहरात गुटख्याची राजरोस विक्री

ताज्या बातम्या

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

धाराशिवमध्ये ‘झिरो पोलीस’ची महिलेला भररस्त्यात अडवून छेडछाड

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात घरात कोयते बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

June 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग परिसरात सोलर कंपनीची ८० हजारांची केबल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

June 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group