• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून ४५ दिवस झाले तरी आरोपी मोकाट 

धाराशिव नगर पालिका घोटाळ्यातील लेखापाल सुरज बोर्डे आणि लेखा परीक्षक पवार यांना पोलिसांचे अभय 

admin by admin
October 11, 2023
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून ४५ दिवस झाले तरी आरोपी मोकाट 
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित घोटाळा प्रकरणी लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून ४५ दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे यांना अद्याप अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बोर्डे आणि आनंदनगर पोलीस यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

धाराशिव नगर पालिकेतील कोट्यवधी रुपयाच्या घोटाळा प्रकरणी  न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल )  आणि प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल यांनी अटकपूर्व जामीन  मिळावा म्हणून  धाराशिव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज २० ऑगस्ट रोजी नामंजूर केला आहे. त्यानंतर प्रशांत विक्रम पवार यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून ४५ दिवस झाले तरी आनंदनगर पोलिसांनी बोर्डे आणि पवार यांना अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आनंदनगर पोलीस बोर्डे आणि पवार यांना अटक करण्यास चालढकल करीत असून, आनंदनगर पोलीस आणि बोर्डे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे ? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

काय आहे प्रकरण ? 

आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद उस्मानाबाद येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या  अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उस्मानाबाद हा. मु. रा. समर्थ नगर उस्मानाबाद यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस थंड 

धाराशिव नगर पालिकेतील कोट्यवधी रुपयाचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग न करता, आनंदनगर पोलिसांकडे देण्यात आले आहे. आनंदनगर पोलीस  सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल )  आणि प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना अटक करीत नाहीत. याबाबत विचारले असता, पोलीस निरीक्षक बांगर हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे कुठं तरी पाणी मुरत असून, आनंदनगर पोलीसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे.  हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे अद्याप वर्ग न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगर पालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यावर आजवर सात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु पोलीस आरोपीना पाठीशी घालत असल्याने धस चांगलेच संतापले आहेत. प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

Previous Post

सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

Next Post

व्यापारी रामचंद्र बांगड अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? 

Next Post
व्यापारी रामचंद्र बांगड अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? 

व्यापारी रामचंद्र बांगड अनधिकृत बांधकाम पालिका केव्हा पाडणार  ? 

ताज्या बातम्या

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १४० कोटींची फेरनिविदा; दिवाळीनंतर कामांना सुरुवात, पण निवडणुकीच्या आचारसंहितेचं काय?

पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?

September 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?
  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!