मुरुम : फिर्यादी नामे-अनुसया विजयकुमार पाटील, वय 40 वर्षे, रा. केसरजवळगा, ता. उमरगा जि. धाराशिव यांचे मुलीचे लग्न असल्याने त्या व त्यांचे नातेवाईक लग्नासाठी बाहेरगाव गेल्या असता त्यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 15.12.2023 रोजी 08.00 ते 17.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील रोख रक्कम 1,16,284₹, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकुण 1,78,584₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनुसया पाटील यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-सुवर्णा विष्णु देशमाने, वय 44वर्षे, रा. जागजी ह.मु. साईनाथ कॉलनी खुनेगाव गावदेवी मंदीर भिवंडी ता. जि. ठाणे या दि. 16.12.2023 रोजी 05.30 वा. सु. धाराशिव बसस्थानक येथे त्यांचे जवळील पर्स खाली ठेवून कंट्रोल रुम येथे जागजी येथे जाणारी बसची विचारपूस करत होत्या. दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांचे पर्स मधील सोन्याचे 15 ग्रॅम वजनाचे गंठन, अंगठी, फुले, झुमके, व चांदीची चईन, चांदीचा करंडा व रोख रक्कम असा एकुण 1,69,530₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुवर्णा देशमाने यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे-मेघश्याम मोहन तारी, वय 43 वर्षे, रा. बांधा ता. सावंतवाडी जि. सिंधदुर्ग यांची अंदाजे 65,000₹ किंमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय. 8217 जिचा चेसी नं –MBLHAW122NHHB 8227, इंजिन नं-HA11EDNHM43773 ही दि. 29.11.2023 रोजी रात्री 21.30 ते दि. 30.11.2023 रोजी 11.45 वा. सु. फिर्यादी मेघश्याम तारी यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मेघश्याम तारी यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे- रोहीदास संजय चव्हाण, वय 35 वर्षे, रा. दुर्गातांडा ता.कंधार जि. नांदेड यांची अंदाजे 5,00,000₹ किंमतीची ट्रक क्र एडी.2291 टाटा एल पी टी कंपनीचा ही बीगाडल्याने. दि. 12.11.2023 रोजी 23.30 ते दि. 13.11.2023 रोजी 03.00 वा. सु. मंगरुळ घाटात रोडवर उभी केलेली असताना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहीदास चव्हाण यांनी दि.16.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.