धाराशिव :आरोपी नामे- 1)सोमनाथ बाळासाहेब जमदाडे, 2) गणेश श्रीहरी जमदाडे दोघे रा. रुईभर ता. जि.धाराशिव यांनी दि.17.12.2023 रोजी 19.00 वा. सु. पल्लवी बार समोर साळुंके नगर बेंबही रोड धाराशिव येथे फिर्यादी नामे-गोपाळ बहिणाजी बिराजदार, वय 50 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बांबुचे काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोपाळ बिराजदार यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे- 1)लक्ष्मण अशोक साळुंके, रा. आष्टा जहागीर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 12.12.2023 रोजी 16.30 वा. सु. आष्टा जहागीर ते तुरोरी जाणारे डांबरी रोडवर आष्टा शिवार येथे फिर्यादी नामे- विठ्ठल हणुमंतसाळुंके, वय 51 वर्षे, रा. आष्टा जहागीर ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने शेत वाटणीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- विठ्ठल साळुंके यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे- 1)सुनिल संपतराव खोसे, वय 50 वर्षे, 2) संदीप सुनिल खोसे, वय 25 वर्षे, रा. लोहटा प. ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.16.12.2023 रोजी 18.00 वा. सु. पिंपहगाव टो. शेत शिवार शेत गट नं 46/1 येथे फिर्यादी नामे- गणेश शाहुराज खोसे, वय 32 वर्षे, रा. लोहटा प. ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातुन ट्रॅक्टर घेवून जाण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच फिर्यादीची आई या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन ढकलुन दिले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश खोसे यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी :आरोपी नामे- 1)संतोष जालींदर गायकवाड, 2) जालींदर नामदेव गायकवाड, 3) भरत नामदेव गायकवाड, 4) सुरेश नामदेव गायकवाड सर्व रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 16.12.2023 रोजी 21.00 वा. सु. देवकुरुळी येथे फिर्यादी नामे-रुक्मीनी वसंत गायकवाड, वय 50 वर्षे, रा. देवकुरुळी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा मुलगा संजय गायकवाड यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांचे पती वसंत, सुन सारीका पुतण्या संतोष हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या पुतण्यास लोखंडी रॉडने व अंगावर चटणी टाकून मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- रुक्मीनी गायकवाड यांनी दि.17.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 452, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.