धाराशिव : फिर्यादी नामे-सुदाम शेषेराव मोराळे, वय 31 वर्षे, रा. तुकूचीवाडी ता. केज जि. बीड यांचे ताब्यातील कंटेनर गाडी क्र एमएच 44 यु 9817 ही बावी शिवारातील तुळजाई पेट्रोल पंपाचे समोर रोडवर लावून झोपले असता अनोळखी पाच व्यक्तीने दि. 19.06.2024 रोजी 01.40 वा. सु. सुदाम मोराळे यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन गाडीतील अंदाजे 7280 ₹ किंमतीचे गाडीतले डिझेल व रोख रक्कम 2,000 ₹ असा एकुण 9,280 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.
याप्रकरणी फिर्यादी नामे-सुदाम मोराळे यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुरंन 206/2024 भा.द.वि.सं. कलम 395 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं 159/2024 भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुरनं 272/2024 भा.द.वि.सं. कलम 394 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुरनं 265/2024 भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहेत.
याप्रकरणी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक फिक्कट सोनेरी रंगाची बोलेरो गाडी ज्यामध्ये पाच ते सहा इसम दरोडा टाकून मोहा ते कळंब कडे तेर मार्गे जात आहेत अशी तांत्रिक विशलेषनावरुन खात्रीशीर महिती मिळाल्याने पोनि मारुती शेळके धाराशिव ग्रामीण, पोह/1469 माचेवाड, तसेच पोस्टे ढोकी येथील सपोफौ830 सातपुते, पोना/ 1871 क्षिरसागर पोका/529 गोडगे असे पथक रवाना होवून नमुद बोलेरोचा पाठलाग केला असता मोहा शिवारात मिळालेल्या वर्णनची बोलेरो पथकास दिसून आली तीस थांबवण्याचा प्रयत्न केला असता नमुद बोलेरो गाडी ही न थांबता मोहा पारधी पीढी जवळ थांबली त्यामधील पाच इसम पळून जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी एकास पथकाने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बालाजी उर्फ पुण्या आप्पा शिंदे, वय 37 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सागिंतले की, मी व माझे इतर चार साथीदार यांनी नमुद गुन्हे केल्याचे कबुली दिली. यावरुन पथकाने त्याच्या ताब्यातुन अंदाजे 5,36,000₹ किंमतीचे डिझेलचे प्लॅस्टीकचे केन्डे, मोबाईल फोन, लोखंडी रॉड, एक लोखंडी चाकू बांगडी पाईप, बोलेरो गाडी असा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.