धाराशिव : फिर्यादी नामे- सविता दत्तात्रय चव्हाण, वय 46 वर्षे, रा. उंबरे कोठा धाराशिव ता. जि. धाराशिव या दि. 19.06.2024 रोजी 16.00 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथे बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून पर्सची चैन उघडून पर्स मधील अंदाजे 2,77,500₹ किंमतीचे 57 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता चव्हाण यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे
धाराशिव – फिर्यादी नामे-सुदाम शेषेराव मोराळे, वय 31 वर्षे, रा. तुकूचीवाडी ता. केज जि. बीड यांचे ताब्यातील कंटेनर गाडी क्र एमएच 44 यु 9817 ही बावी शिवारातील तुळजाई पेट्रोल पंपाचे समोर रोडवर लावून झोपले असता अनोळखी पाच व्यक्तीने दि. 19.06.2024 रोजी 01.40 वा. सु. सुदाम मोराळे यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन जबरीने 7280 ₹ किंमतीचे गाडीतले डिझेल व रोख रक्कम 2,000 ₹ असा एकुण 9,280 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुदाम मोराळे यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 395 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव – : फिर्यादी नामे- इंद्रप्रताप रामचंद्र यादव, वय 55 वर्षे, रा. सरायसैफ ता. निजामाबाद जि. आजमगढ उत्तरप्रदेश हे त्यांचे ताब्यातील कंटेनर क्र टीएस 07 युएच 1753 मध्ये ओमकार लुझीस्टीक ट्रान्सपोर्ट होसुन तामीळनाडू येथुन टिव्हीएस स्कुटर चा माल धाराशिव येथे उरवण्यासाठी येत असताना अज्ञात तिन इसमांनी दि. 19.06.2024 रोजी 04.00 वा. सु. प्रथमेश धाब्याजवळ सर्विस रोडवर धाराशिव येथे बोलेरो गाडी आडवी लावून हाताला धरुन बळजबरीने कंटेनरमधून खाली ओडून लाथाबुक्यांनी मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून खिशातील रोख रक्कम 2,000₹, मोबाईल फोन, गाडीतील डिझेल बळजबरीने काढून घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-इंद्रप्रताप यादव यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 394, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर – : फिर्यादी नामे-आलील आब्दुल सत्तार कुरेशी, वय 35 वर्षे, रा. रा नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची गाडी क्र केए 56-7223 ही दि. 19.06.2024 रोजी 03.00 वा. सु. जगदंबा सेल्स ॲड सर्विस रोड बायपास तुळजापूर येथे उभी केली असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे गाडीमधील अंदाजे 10,920 ₹ किंमतीचे 120 लि. डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आलील आब्दुल यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : दि. 04.06.2024 रोजी 04.00 ते 22.00 वा. सु. तहसील कार्यालय परंडा येथे जप्त करुन लावलेली एक विना नंबर ट्रॅक्टरची ट्रॉली अंदाजे 70,000₹ किंमतीची एक ब्रास वाळू तेथेच टाकुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नितीन बापुसाहेब भांडवलकर, वय 35 वर्षे, व्यवसाय अवृवल कारकुन(महसुल) तहसील कार्यालय परंडा रा. वाटेफळ ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.