धाराशिव : मयत नामे-लालासाहेब हनुमंतराव झांबरे, वय 47 वर्षे, रा. सुर्डी ता. जि. धाराशिव हे दि.16.10.2023 रोजी 18.45 वा. सु. बेगडा पोहनेर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय वरुन धाराशिव कडे जात होते. दरम्यान आडगळे यांचे धाब्या जवळील वळणावर बेगडा शिवार येथे त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही स्लिप होवून लालासाहेब झांबरे हे खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी नामे- विजया लालसाहेब झांबरे, वय 45 वर्षे, रा. सुर्डी ता. जि. धाराशिव यांनी दि.22.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : मयत नामे-गणेश मारुती नरवाडे, रा. देगाव ता. देगलूर जि. नांदेड हे दि.21.10.2023 रोजी 18.30 वा. सु. आनंद भारती बाबा यांचे दिंडी सोबत घानगापुर येथे पायी चालत जात होते. दरम्यान लातुर ते उमरगा रोडवर माईल स्टोन 548(बी) कलबुर्गी 87 जवळ सावळसुर शिवार येथे आरोपी नामे- विश्वजीत सरवदे रा. रामपूर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एएक्स 5273 ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून दिंडीमध्ये घुसवुन फिर्यादी, गणेश नरवाडे व इतर यांना गंभीर व किरकोळ जखमी झाले. या अपघातात गणेश नरवाडे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादु पिराजी देवकर, वय 50 वर्षे, रा. आजणी, ता. बिलोली जि. नांदेड यांनी दि.22.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.