विकासाभिमूख नेता, धाडसी आक्रमक पण हळव्या मनाचा नेता. डॉ पद्मसिंह पाटील साहेबांनी ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला त्यांचे वडील बाजीराव पाटील हे बारा वाड्याचे कारभारी होते. पंचक्रोशीतील लोक त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येत असत. वडीलांच्या वारसाहक्काने गाव परिसरातील लोकांची काम करत तेर येथून डॉ पाटील साहेब यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. समाज सेवेचे बाळ कडू घरातूनच मिळाल्यामुळे ते राजकाराणाकडे वळाले. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपले पणाची वागणूक देऊन ने आस्थेवाईकपणे विचारपूस करत या स्वभावामुळेच ते लवकरच लोकामध्ये लोकप्रिय झाले.
सन 1974 ला त्यांनी जिल्हा परिषदेत आरोग्य व बांधकाम सभापतीपद भूषवले त्यानंतर 1978 ला शरद पवार साहेब यांच्या पुलोद सरकारध्ये दारुबंदी व उर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून सतेत सहभाग नोंदवला 1999 च्या काळात डॉ. पाटील साहेबांनी पाटबंधारे व उर्जा मंत्री म्हणून काम पाहिले याकाळात कोल्हापुरी बंधारे कालवे धरणे यांची निर्मीती केली, साहेबांनी रस्ते, औद्योगीकरण, सहकार या गोष्टीकडे जसे लक्ष दिले त्याहीपेक्षा सिंचनाच्या क्षेत्रात जास्त लक्ष दिले व त्यात धाराशीव जिल्हयाने अघाडी घेतली. त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या गोरगरीब लोकांच्या आरोग्याकडे त्यांचे लक्ष होते. जेंव्हा मी प्रचारानिमित्त किंवा इतर कामानिमीत्त ग्रामीण भागात जाते तेंव्हा आजही ग्रामीण भागातील लोक डॉ. साहेबांनी आम्हाला कशी मदत केली ते भावुक होऊन सांगतात. संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ते रात्र – रात्र गावातील चावडीमध्ये बसून फॉर्म भरून घेत महाराष्ट्र मध्ये गरीबांना सर्वात जास्त लाभ मिळवून देणारा आमदार अशी ओळख त्यांची झाली. दुष्काळामुळे मराठवाड्यासह धाराशिव जिल्हा होरपळून निघत आहे. धाराशिवचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी उजनीचे पाणी आणण्याचे काम डॉ. पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाले व राणादादा यांच्या रुपाने ते पूर्णत्वास आले.
राजकारणात काही चढउतार अनुभवास येतात त्यांनी मोठ्या धीराने त्यावर मात केली, कधी सत्तेची धुंदी चढू दिली नाही की पदाचा मोह धरून उतावळेपणा दाखविला नाही. सामंजस्याने मार्ग काढणे व सर्वांशी प्रेमभाव – राखणारा नेता, कधी मनात वैर किंवा पुर्वग्रहदुषीतपणा ठेवा नाही. सर्वांना मदतीचा हात पुढे करतात. अशा संयमाने विषय हातळण्याचे वैशिष्ट त्यांनी जपले म्हणूनच आज हि त्यांच्या नावाभोवतीचे वलय कमी झालेले नाही. अशा नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणावेसे वाटते,
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणी आनंद घेऊन येवो
देवाकडे प्रार्थना आहे की
आयुष्यात आरोग्य, समृध्दी मिळो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
- सौ नंदाताई सुरेशराव पुनगडे
जिल्हाध्यक्षा
भाजप महिला मोर्चा धाराशिव