धाराशिव – महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या ३० एप्रिल रोजी धाराशिव शहरातील तुळजापूर रोडवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मोदी यांच्या या सभेमुळे यादिवशी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
यानिमित्त पोलीस विभागाने परिपत्रक जरी केले आहे, ते असे…
ज्याआर्थी पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा, धाराशिव यांनी त्यांचे कडील पत्र जा. क्र 364/2024 दिनांक 26.04.2024 अन्वये सादर केलेल्या अहवालात सादर केले आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान, भारत सरकार यांचा दिनांक. 30.04.2024 रोजी धाराशिव जिल्हा दौरा नियोजित आहे. MSEB विश्राम गृह, NH 52 धुळे – सोलापूर महामार्ग चे समोर धाराशिव ता. जि. धाराशिव येथे दिनांक 30.04.2024 रोजी जाहिर सभा आयोजित आहे.
मा. महोदय यांचे सुरक्षा तसेच जाहिर सभे करिता मोठ्या संख्येने लोक सभास्थळी येणार असल्याने, अशा वेळी वाहतुकीची कोंडी होवु नये. तसेच सभे करिता येणारे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या करीता धाराशिव ते तुळजापूर कडे जाणारे आणि तुळजापूर ते धाराशिव कडे येणारे मार्गावरील वाहतुक अन्य मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे आमचे निदर्शनास आणून दिले आहे.
त्याआर्थी आम्ही डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से) जिल्हादंडाधिकारी, धाराशिव व अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, धाराशिव आम्हास प्राप्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) (ब) अन्वये अधिकाराचा वापर करुन सभे करीता येणारे नागरिकांचे सुरक्षीततेच्या कारणावरुन, खालील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे बाबत निर्देशित करीत आहोत.
दिनांक 30.04.2024 रोजीचे 10.00 वा. ते दुपारी 16.00 वा. वाजे दरम्यान खालील मार्गावरुन पथक्रमण करण्यास सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे.
1) NH 52 वरुन धाराशिव ते मौजे वडगाव सि. मार्गे तुळजापूर कडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बेंबळी टी पॉईट – वडगाव सि. – धाराशिव रोड बायपास ब्रीज तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
2) NH 52 वरुन तुळजापूर ते मौजे वडगाव सि. मार्गे धाराशिव कडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास धाराशिव रोड बायपास ब्रीज तुळजापूर- वडगाव सि.- शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय चौक धाराशिव या दरम्यान मनाई करण्यात येत आहे.
सदरील मार्गावरील वाहने खालील प्रमाणे मार्गक्रमण करतील
1) ) NH 52 वरुन धाराशिव ते मौजे वडगाव सि. मार्गे तुळजापूर कडे जाणारी वाहतुक बेंबळी टी पॉईंट – रुईभर- बेंबळी- केशेगाव मार्गे- तुळजापूर कडे पथक्रमण करतील.
2) ) NH 52 वरुन तुळजापूर ते मौजे वडगाव सि. मार्गे धाराशिव कडे येणारी वाहतुक धाराशिव रोड बायपास ब्रीज तुळजापूर- केशेगाव- बेंबळी- रुईभर- बेंबळी टी पॉईट मार्गे धाराशिव कडे पथक्रमण करतील.
किंवा धाराशिव रोड बायपास ब्रीज तुळजापूर- अपसिंगा- पोहणेर- गावसुद मार्गे- तुळजापूर नाका टी पॉईट मार्गे धाराशिव कडे पथक्रमण करतील.
वरील बंधने ही पोलीस, रुग्ण सेवा, अग्निशमन दलाच्या वाहने व अत्यावश्यक सेवेतील इतर वाहनांना लागू राहणार नाही.