धाराशिव :आरोपी नामे-1)समीर अमजदअली सय्यद, 2) उस्मान ईस्माईल शेख, 3) हासन ईस्माईल शेख, 4) वाजीद महेबुब शेख सर्व रा. खॉजानगर धाराशिव यांनी दि.01.03.2024 रोजी 15.30 वा. सु. आर.के. रेडीयम दुकानासमोर खॉजानगर धाराशिव येथे फिर्यादी नामे- अरफत मोहम्मद याकुब काझी, वय 47 वर्षे, रा. गल्ली नं 16 खॉजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना खडी उचलनेचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, ब्लेडने मारहाण करुन जखमी केले. तु आता धंदा कसा करतो ते बघु असे म्हणून धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अरफत काझी यांनी दि.02.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-अरफत काझी रा. खॉजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 01.03.2024 रोजी 15.30 वा. सु. आर.के. रेडीयम दुकाना समोर खॉजानगर धाराशिव येथे फिर्यादी नामे- समीर अली अमजदअली सय्यद, वय 31 वर्षे, रा. खॉजानगर गल्ली नं 12 धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने खडी उचल असे म्हाणाला त्यावर फिर्यादी म्हाणाले की उद्या खडी उचलतो असे म्हणताच नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकूने मारहाण करुन जखमी केले. व फिर्यादीचा मित्र इलियास निसार शेख हे भांडण सोडवण्यास आले असता त्यासही शिवीगाळ करुन डाव्या दंडावर चाकून मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- समीरअली सय्यद यांनी दि.02.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-लहु नागनाथ कोराळे, रा. थोरलीवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव व इतर अनोळखी तीन इसम यांनी दि.25.02.2024 रोजी 01.30 ते 02.30 वा. सु. धाकटीवाडी शिवारात फिर्यादी नामे- मारुती दौलाप्पा शिताळगिरे, वय 65 वर्षे, रा. धाकटीवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील एक महिन्यापुर्वी राजेंद्र शिताळगिरे यांना शेतात पाणी का दिले या कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीचे 20 पीव्हीसी पाईप तोडून नुकसान केले ते फिर्यादीने भरपाई करुन मागितल्याने त्यांचात भांडण होवून त्याचा राग मनात धरुन नमुद आरोपींनी संगणमत करुन फिर्यादी हे त्यांचे घरासमोर बाजेवर झोपेत असताना बाजेवरुन खाली पाडून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तोंडात विषारी औषधाची बाटली ओतून विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मारुती शिताळगिरे यांनी दि.02.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 307,328, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.