येरमाळा : फिर्यादी नामे- वाहीद ईनुस बागवान, वय 43 वर्षे, रा.येरमाळा ता.कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 2,00,000₹ किंमतीचा महिंद्रा पिकअप क्र एमएच 25 पी 0923 हा दि. 26.02.2024 रोजी 23.00 ते दि. 27.02.2024 रोजी 06.00 वा. सु येरमाळा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वाहीद बागवान यांनी दि.29.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- प्रमोद प्रकाश बिराजदार, वय 40 वर्षे, रा. वागदरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 65,000 ₹ किंमतीचा होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 14 जीएस 8912 हा दि. 28.02.2024 रोजी 12.00 ते दि. 29.02.2024 रोजी 06.00 वा. सु प्रमोद बिराजदार यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रमोद बिराजदार यांनी दि.29.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
तुळजापूर : मयत नामे-1) नरसिंग अशोक सुरवसे, वय 32 वर्षे, पेठ, निलंगा ता. लातुर हे दि.29.02.2024 रोजी 14.30 ते 15.00 वा. सु.ऑटोरिक्षा क्र एमएच 12 व्हीबी 4880 चा चालक आरोपी नामे – विलास पांडुरंग सुर्यवंशी रा. पेठ निलंगा ता. निंलगा जि. लातुर यांचे रिक्षा मधून जात होते. दरम्यान आरोपी नामे विलास सुर्यवंशी यांनी नमुद रिक्षा हा हायगई व निष्काळजीपणे चालवून काक्रंबा शिवारात जय मल्हार हॉटेलजवळ तुळजापूर येथे रिक्षा पल्टी करुन अपघात केला. या अपघातात नरसिंग सुरवसे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- किरण फुलचंद वाघे, वय 30 वर्षे, रा. कार्ला ता. औसा जि. लातुर यांनी दि.29.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब), मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.