धाराशिव :आरोपी नामे-1)श्रेया काशीनाथ राजपुत, 2) दिप काशीनाथ राजपुर, 3) काशीनाथ राजपुत, 4) मनोज ठाकुर, 5) बादल वायस, 6) राधे वायस, 7) सगर वायस सर्व रा. बोंबले हनुमान चौक वासुदेव गल्ली धाराशिव यांनी दि. 10.03.2024 रोजी 18.00 वा. सु. बोंबले हनुमान चौक अंबीका जनरल स्टोअर्स च्या समोर धाराशिव येथे फिर्यादी नामे- राहुल भैरु पवार, वय 25 वर्षे, रा. बोंबले हनुमान चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जुन्या भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण केल्याने व चावा घेतल्याने फिर्यादी हे बेशुध्द झाले असता त्यांचे हातातील व गळ्यातील 15 ग्रॅम वजनचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 6,000 ₹ काढुन घेतले. तसेच फिर्यादीची पत्नी यांनाही नमुद आरोपींनी शिवीगळ करुन हातावर चावा घेवून जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी राहुल पवार यांनी दि.11.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 308, 143, 147, 149, 327, 323 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-फिरोज ईस्माईल शेख रा. विकास नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.03.2024 रोजी किणी येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर रोडवर फिर्यादी नामे- वशीम शफिक शेख, वय 32 वर्षे, रा. किणी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे करणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी वशीम शेख यांनी दि.11.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे- विजय उत्रेश्वर बावळे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 26.02.2024 रोजी रात्री 09.30 वा. सु. ईटकुर येथील बावळे मेडीकल समोर फिर्यादी नामे- धनाजी रामकिसन आडसुळ, वय 36 वर्षे रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने ट्रॅक्टरवर कामाला यावे लागेल या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने हाताचे कोपऱ्यावर मारुन डावे हाताचे पोटरी फॅक्चर करुन ट्रॅक्टरवर कामाला आला नाही तर तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी धनाजी आडसुळ यांनी दि.11.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 325, 323, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शासकिय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा नोंद
येरमाळा : फिर्यादी नामे- गणेश सुरेश अवदुत, वय 32 वर्षे, व्यवसाय तंत्रज्ञ म.वि.क. दहीफळ रा. अवधुतवाडी ह.मु. कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे व त्यांचे सहकारी दि. 11.03.2024 रोजी 10.00 वा. सु. सापनाई येथील शेत शिवार येथे शासकीय कामकाज करत असताना आरोपी नामे-प्रेमनाथ नवनाथ डोके, 2) प्रसाद प्रेमनाथ डोके, रा. सापनाई ता. कळंब जि. धाराशिव यांनी लाईटचा पोल उभ करण्यासाठी परमिट का दिले नाही या कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादी व त्यांचे सहकारी यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शिवीगाळ करुन दगड व काठीने मारुन जखमी केले. व जिवे ठार मरण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरुन गणेश अवदुत यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि. सं. कलम- 353, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.