शिराढोण : आरोपी नामे- 1)विनोद रामा पवार, रा. ईला, ता. जि. धाराशिव ह.मु. रत्नकृपा निवास गुलाम अली नगर पुणे यांनी दि.04.11.2023 रोजी ईर्ला गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अन्वर शेख यांच्या हॉटेल समोर फिर्यादी नामे- बाळु मुरली पवार, वय 51 वर्षे, रा. ईर्ला, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीनी शेळी पालक का विकु देत नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बाळु पवार यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324,337, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी :आरोपी नामे- 1)अंकुश सावळा शिंदे, 2)अनिल अंकुश शिंदे, 3) ताराबाई अंकुश शिंदे, तिघे रा. आनंदवाडी ता. भुम जि. धाराशिव, यांनी दि.03.11.2023 रोजी 17.00 वा. सु. आनंदवाडी ता. भुम येथे फिर्यादी नामे- सुरेश सावळा शिंदे, वय 45 वर्षे, रा. आनंदवाडी ता. भुम, जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमचा दुशमन बाळु यांच्याशी का बोलतो? या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुरेश शिंदे यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 324, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे- 1)जयकुमार मुकिंद चौरे, 2)अर्चना जयकुमार चौरे, 3) प्रशात जयकुमार चौरे, 4) साखरबाई मुकिंद चौरे, सर्व रा. ईर्ला, ता. जि. धाराशिव, यांनी दि.05.11.2023 रोजी 19.30 वा. सु. ईर्ला येथे फिर्यादी नामे-बालीका रामहारी चौरे, वय 39 वर्षे, रा. ईर्ला, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा कार्तीक हा भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी कार्तीक याचे डोक्यात विटाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालीका चौरे यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम :आरोपी नामे- 1)आब्बास मुसा शेख, 2)सलीम सय्यद शेख, 3)अफताब बाबु शेख,4) अल्ताफ बाबु शेख,5) बाबु शखे, 6) रफिक मुसा शेख, 7) महंम्मद सय्यद शेख, 8) अलिशा बाबु शेख सर्व रा. भोगलगाव ता. भुम जि. धाराशिव, यांनी दि.03.11.2023 रोजी 15.00 वा. सु. भोगलगाव शिवारातील शेत गट नं 61 येथे फिर्यादी नामे- महारुद्र भास्कर काळे, वय 35 वर्षे, रा. भोगलगाव, ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत मोजणी झाल्यानंतर खुणा करण्याच्या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, दगड, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी मनिषा व वडील भास्कर काळे हे भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- महारुद्र काळे यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 326, 324, 323, 504,506, 143, 147, 148, 149,भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.