• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

७०० हून अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेत भाजपच राज्यात मोठा भाऊ

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा कौल देवेंद्र फडणवीसांना !

admin by admin
November 6, 2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपला आघाडी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा, त्यातून झालेली टीका हे सगळं पचवून राज्यातल्या सत्ताधारी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आस्मान दाखवलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील ओबीसी आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ देत ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचं दान भाजपच्या पदरात टाकलंय. आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांपैकी 427 ग्रामपंचायती म्हणजे 33 टक्के यश एकट्या भाजपला मिळालंय.

राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मनोज जरांगे – पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या उपोषणानंतर राज्यात मोठं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मनोज जरांगे – पाटील यांनी भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, या टीकेचे धनी होऊन देखील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येनं मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं निवडणूक निकालांमधून स्पष्ट होतंय. त्याचबरोबर राज्यातल्या ओबीसी समाजाने देखील देवेंद्र फडणवीसांना पूर्वीपासून दिलेली साथ अजूनही सोडलेली नाही. उलट ओबीसी आणि मराठ्यांनीच भाजपचा हा मोठा विजय साकार केल्याचं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलंय. यामुळे राज्याचं खरं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच असल्याच्या विचाराला आता पुन्हा बळकटी मिळताना दिसतेय.

ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या दुपारी 3.30 वाजता आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप ७१७ राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ४०७, शिवसेना (शिंदे गट) २६२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) १८५, कॉंग्रेस २०७, शिवसेना (ठाकरे गट) ११४, आणि इतर 60 आहेत.

आंदोलनातील टीकेचा परिणाम नाही

मराठा आरक्षण आंदोलन काळात टीका होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जरांगे – पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्यांमध्ये 4 मंत्र्यांसह 2 माजी न्यायमूर्तींना पाठवण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या माजी न्यायमूर्तींंनीची जरांगेंना आरक्षण मिळवण्यासाठी लागणारा वेळ व त्यामागची कायदेशीर गुंतागुंत समजवून सांगितली. हे जाणून घेतल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा संदेश जनतेत गेला.

हे सगळं होत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच अतिशय भरघोस यश भाजपच्या पारड्यात पडल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. निवडणूक निकालांमधून हे सिद्ध होत असून निकाल येण्यासाठी शिल्लक राहिलेल्या इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी घेतली आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!