धाराशिव : मयत नामे- मनोज सुरेश घोगरे, वय 45 वर्षे, रा. उपळे मा. ता.जि.धाराशिव हे दि.05.11.2023 रोजी 22.00 वा. सु. मोटरसायकल वरुन हनुमान चौक जवळ धाराशिव येथुन जात असताना मोसा क्रमांक एम एच 13 बीडी 5079 चा चालकाने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल ही हयगई व निष्काळजीपणे भरघाव वेगात चालवुन ट्रॅक्टरला ओव्हरटेक करीत असताना जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी मुकेश दिगंबर नवले, वय 44 वर्षे, रा. उपळे मा.उपळे ता.जि.धाराशिव यांनी दि.07.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
मुरुम :आरोपी नामे- 1)जयराम भिमा राठोड, 2) जयाबाई जयराम राठोड ,3) श्रीराम भीमा राठोड सर्व रा. भांडगाव ता. अंबर नगर तांडा ता.उमरगा यांनी दि.04.11.2023 रोजी फिर्यादी यांचे घरासमोर येवुन फिर्यादी नामे- कलावती भ्र नारायण राठोड वय 34 वर्ष रा.अंबरनगर तांडा ता.उमरगा यांना नमुद आरोपीनी उसतोडी साठीचे पैसे देणेघेणेच्या कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुदळीच्या दांडयाने केसाला धरुन मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कलावती राठोड यांनी दि.07.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 325, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरी
येरमाळा : फिर्यादी नामे- दिनेश शिवराज गवशेटटी, वय 38 वर्षे, रा. काडादी चाळ रेल्वे लाईन सोलापुर, यांचा अंदाजे 2,11,089,/-₹ किंमतीच्या सिल्क साडयाचे 111 बॉक्स,शर्टाचे 128 बॉक्स व लेडीज ब्रा बॉक्स मधील 14 नग असे वाहन क्र केए 25 बी 8164 व दुसरे वाहन क्रमांक केए 25 सी 5207 मधुन दिनांक 30/10/2023 रोजी पहाटे 05.30 वा चे सुमारास रत्नापुर शिवारातील बांगर हॉटेल जवळुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रकवरील ताडपत्री फाडुन चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- दिनेश गवशेटटी यांनी दि.07.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.