तुळजापूर : फिर्यादी नामे- कृष्णा दत्तात्रय काळे, वय 26 वर्षे, रा. वासुदेव गलृली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची टिव्हिएस स्कुटी क्र एमएच 25 एवाय 2493 ही दि.27.10.2023 रोजी 23.00 ते दि. 28.10.2023 रोजी 02.00 वा. सु. हॉटेल श्रेयस कामत तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कृष्णा काळे यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-अशोक नरहरिराव सोडगीर, वय 52 वर्षे, व्यवसाय नोकरी बारामती फाटा(एचएसपी) जिल्हा पुणे ग्रामीण हे व सोबत त्यांची पत्नी असे लातुर येथे जाण्यासाठी तुळजापूर बसस्थानक येथे गेले असता फिर्यादी हे खाजगी वाहन बघण्यासाठी बाहेर गेले असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे पत्नीस तुमचे पैसे पडलेत असे म्हणून त्यांचे समोरील बॅग ज्यामध्ये रोख रक्कम 3,000 ₹, पावर बँक, खाकी वर्दी, बेल्ट, कॅप, दोन साधे ड्रेस, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अशोक सोडगीर यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-साहेबलाल बशीर शेख, वय 53 वर्षे, रा. रामलिंगनगर येडशी ता. जि. धाराशिव हे दि.26.10.2023 रोजी 12.50 वा. सु. स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा येडशी येथे 33,000₹ पैसे भरण्यासाठी गेले असता अज्ञात दोन व्यक्तीने साहेबलाल शेख यांना बोलन्यामध्ये व्यस्त ठेवून त्यांचे 14,500₹ काढून घेवून निघून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- साहेबलाल शेख यांनी दि.30.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.