वाशी : फिर्यादी नामे- नयाससोद्दीन शाहिद खान, वय 28 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मुहरैया, ता. नौगढ जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश हे कपुर डिझेल्स कंपनीचे कंटेनर मध्ये टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मोडेलच्या 40 गाड्या भरुन म्हैसुर राज्य कर्नाटक येथुन जयपुर, राज्यस्थान येथे घेवून जात असताना दि.04.11.20233 रोजी रात्री 07.30 वा. सु. इंदापुर शिवारातील बंद असलेल्या साखर कारखान्या समोर एनएच 52 रोडवरील सर्व्हीस रोडलगत कंटेनर उभा करुन नयाससोद्दीन खान हे बाथरुमला जावून आले व गाडीत बसले असता आनोळखी पाच व्यक्तीने नयाससोद्दीन खान लाथाबुक्यांनी वकाठ्यांनी मारहाण केली. व गळ्याला चाकु लावून नयाससोद्दीन खान यांचे खिशातील रोख रक्कम 27,000₹ कंटेनर मधील टि.व्ही. एस कंपनीच्या आपाची मोडेलच्या 7 मोटरसायकल प्रति मोटरसायकल 90,742 ₹ प्रमाणे असे एकुण 6,62,194₹ माल जबरीने काढून घेतला. अशा मजकुराच्या फिर्यादी- नयाससोद्दीन खान यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 395, 397 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे- दिलीप तुकाराम लटपटे, वय 47 वर्षे, रा. लाडेगाव ता. केज जि. बीड त्यांच्या मालकीच्या ट्रक क्र एम एच 44 5797 मध्ये सोयाबीनचे 335 पोते भरुन परतुर ते सोलापूर जात असतना दि. 04.11.2023 रोजी 03.30 ते 04.00 वा. सु. जवळा पाटीचे पुढे काही अंतरावर ता. कळंब जि. धाराशिव येथे नमुद ट्रकचा आपघात झाल्याने त्यामधील सोयाबीनचे 216 पोते अंदाजे 5,50,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दिलीप लटपटे यांनी दि.05.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.