वाशी : फिर्यादी नामे- ध्न्वंतरी आनंदराव देशमुख, वय 60 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव, हे व त्यांचा मुलागा व सुन असे घरामध्ये झोपलेले असता त्यांचे किचनचा पाठीमागील लोखंडी दरवाज्याचे कुलूप अनोळखी 4 व्यक्तींनी दि. 24.10.2023 रोजी 01.45 ते 02.30 वा. चे सुमारास तोडून आत प्रवेश करुन घरातील लाकडी कपाटातील 103 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 2,57, 500₹ किंमतीचे चोरुन घेवून जात असताना फिर्यादीची सुन नामे स्नेहल यांनी एका अज्ञात चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता नमुद अज्ञात चोरट्याने स्नेहल हिच्या ओठांवर चाकु मारुन दुखापत जखमी केले. व चाकुचा धाक दाखवून बळजबरीने सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- धन्वंतरी देशमुख यांनी दि.24.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 394, 457, 380, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : फिर्यादी नामे- रामदास सोपान तांबे, वय 61 वर्षे, रा. गोलेगाव, ता. भुम जि. धाराशिव, यांचे राहाते घरात अनोळखी 3 व्यक्तींनी दि. 24.10.2023 रोजी 00.20 ते 00.40 वा. चे सुमारास प्रवेश करुन फिर्यादीस व त्यांची पत्नी यांना दगडाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. व फिर्यादीचे पत्नीच्या गळ्यातील 15,000₹ किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे मणीमंगळसुत्र बळजबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- रामदास तांबे यांनी दि.24.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 394, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-मारुती विठोबा अंजीखाने, वय 55 वर्षे, रा. ओपली पुरज रोड विजापुर ता. जि. विजापुर हे दि. 24.10.2023 रोजी 19.00 वा. सु. श्री. तुळजाभवानी मंदीराचे होमाजवळ तुळजापूर येथे असताना आनोळखी दोन मुले व एक महिला यांनी मारुती अंजीखाने यांचे खिशातील ओपो कंपनीचा अंदाजे 6,000₹ किंमतीचा मोबाईल फोन जबरीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- मारुती अंजीखाने यांनी दि.24.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : फिर्यादी नामे- वैजीनाथ विश्वनाथ कागे, वय 42 वर्षे, रा. भोसगा ता. लोहारा जि. धाराशिव, यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 23.10.2023 रोजी 11.30 ते 12.30 वा. चे सुमारास तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटाचे दार तोडून 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 2,74, 000₹ किंमतीचे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी- वैजीनाथ कागे यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सोमनाथ राजेंद्र पवार, वय 26 वर्षे, रा. खंडाळा ता. तुळजापूर जि. धाराशिव, यांचे ज्ञानसाई कॉम्पलेक्स खंडाळा येथील दुकानात कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 23.10.2023 रोजी 00.45 ते 03.30 वा. चे सुमारास तोडून आत प्रवेश करुन लाकडी ड्राव्हर मधील व्हिवो कंपनीचा वाय 16 मोबाईल, रोक रक्कम 8,300₹ व हातातील स्मार्टवाच फायर बोल्ट कंपनीचे असा एकुण 19,300 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- सोमनाथ पवार यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-निलेश बिरु जोगी, वय 22 वर्षे, रा. म्हाळंगी एम.आय. डी. सी. चाकण ता. खेड जि. पुणे ह.मु. रामलिंग मुदगड ता. निलंगा जि. लातुर यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 14 जे. एफ. 3518 ही दि. 14.10.2023 रोजी 15.15 वा. सु. गणेश मेडीकल हमिद नगर उमरगा येथे उभी केली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- निलेश जोगी यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-सुमन वसंतराव गुरव, वय 55 वर्षे, रा. विकास नगर ज्ञानदिप सोसायटी सोलापूर यांचे पर्स मधील 12,000₹ हे दि. 19.10.2023 रोजी 16.00 वा. सु. गुगळगाव शिवारातील शेतात आरोपी नामे- दत्ता व्हनाळे रा. गुगळगाव ता. उमरगा जि. धाराशिव यांनी चोरुन घेतले असे फिर्यादी यांचे आईने चोरीचा आरोप आरोपीवर का घेतला असे म्हणून फिर्यादीचे आईस नमुद आरोपीने शिवीगाळ करुन तुला बघून घेतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुमन गुरव यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.