धाराशिव : आरोपी नामे-1)अक्षय रामहरी पडवळ, 2) रामहरी दशरथ पडवळ दोघे रा. सांजा ता.जि. धाराशिव यांनी दि.18.03.2024 रोजी 17.0 0 वा. सु. शेत गट नं 448 सांजा शिवार मधील धाराशिव ता. जि. धाराशिव येथील फिर्यादी नामे- सत्यभामा किसन मोहिते, वय 50 वर्षे, रा. जि.प. शाळेच्या पाठीमागे सांजा ता.जि. धाराशिव यांचे कडब्याच्या गंजीस आग लावून पेटवून दिली. यामध्ये फिर्यादीचे अंदाजे 40,000₹ चे नुकसान केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सत्यभामा मोहिते यांनी दि.21.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 435, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1)सोमनाथ भारत हावळे, 2) भारत हावळे, 3) बंटी भारत हावळे, 4) नंदाबाई भारत हावळे, सर्व रा. बोरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.04.2024 रोजी 18.30 वा. सु. जिल्हा परीषद शाळेसमोर बोरी येथे रोडवर ता. तुळजापूर येथे फिर्यादी नामे- रणजित मच्छिंद्र हावळे, वय 41 वर्षे, रा. बोरी ता. तुळजापूर जि.धाराशिव यांचे मोटरसायकलला कट मारल्याने ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रणजित हवळे यांनी दि.21.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-1)नागेश उर्फ दादु सुब्राव पवार, 2) अनिल रामा पवार, दोघे रा. तेर ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.04.2024 रोजी 15.00 वा. सु. बसस्थानक तेरच्या पाठीमागे मोकळ्या जागेमध्ये फिर्यादी नामे- विकास विश्वंभर काळे, वय 21 वर्षे, रा. पारधीपीडी तेर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी क्रिकेट खेळण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, स्टंपने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास काळे यांनी दि.21.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.