धाराशिव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चार चाकी आणि दुचाकी वाहनाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पीकअप व मोटरसायकलसह दोन आरोपी जेरबंद करण्यात यश आले आहे.
पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, केज जि. बीड येथील पोलीस ठाणे बेंबळी व तुळजापूर येथील चोरीस गेलेले वाहन अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लागलीच केज जि. बीड येथे जावून आरोपीचा शोध घेत असताना दोन इसम पथकास पाहून पळून जत असताना पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- 1)नय्युम शब्बीर शेख, वय 45 वर्षे रा. केज जि. बीड, 2) प्रितम मोहनराव चव्हाण, वय 27 वर्षे, रा. केज जि. बीड असे सागिंतले.
आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही व आमचे इतर दोन मित्र यांनी गेल्या काही दिवसात तुळजापूर येथुन एक अशोक लेलॅड दोस्त कंपनीचा पिकअप अंदाजे 3,10,000₹ किंमतीचा व बेंबळी येथुन एक काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल अंदाजे 30,000₹ किंमतीची चोरी केली आहे. अशी कबुली दिल्यावरुन नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले एक पिकअप 1 ,मोटरसायकल असा एकुण 3,40,000 ₹ किंमतीचा माल जप्त करुन त्याची खात्री करता ते पिकअप व मोटरसायकल पोलीस ठाणे तुळजापूर गुरंन 176/2023, कलम 379, बेंबळी पोलीस ठाणे गुरनं 335/2023 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. तसेच पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस चोरीच्या पिकअप व मोटरसायकलसह तुळजापूर व बेंबळी पोलीसांच्या ताब्यात दिले.