• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव लाचखोरी प्रकरण: कहाणीत नवा ट्विस्ट! ACB कार्यालयातूनच लाचखोर पोलीस निरीक्षकाने ठोकली धूम

फिल्मी पाठलागानंतर पुन्हा मुसक्या आवळल्या!

admin by admin
June 26, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाचखोरी प्रकरण: कहाणीत नवा ट्विस्ट! ACB कार्यालयातूनच लाचखोर पोलीस निरीक्षकाने ठोकली धूम
0
SHARES
2.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – काल ९५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पोलीस निरीक्षकाच्या कहाणीने आज एक असे नाट्यमय वळण घेतले आहे, की ऐकणाऱ्यालाही घाम फुटावा! ज्याच्या नावाने गुन्हेगार थरथर कापायचे, तोच पोलीस निरीक्षक मारोती शेळके आज चक्क एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कार्यालयातून पसार झाला. या घटनेने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या हातावर तुरी, शहरात थरार!

काल लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना, पी.आय. शेळके यांनी संधी साधली. क्षणार्धात त्यांनी अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन धूम ठोकली. ज्यांनी आयुष्यभर आरोपींना पळताना पाहिले, त्यांच्यावरच आज आरोपीसारखे पळण्याची वेळ आली. शेळके यांच्या पलायनाने ACB अधिकाऱ्यांची प्रचंड धावपळ उडाली.

पोलिसांनी केला पोलिसाचाच फिल्मी स्टाईल पाठलाग

यानंतर धाराशिवच्या रस्त्यांवर सुरू झाला एक थरारनाट्य! पुढे लाचखोर पी.आय. आणि मागे त्याला पकडण्यासाठी धावणारे ACB चे पोलीस. शहरातील गजबजलेल्या लेडीज क्लब समोरील रस्त्यावर पोलिसांचा पोलिसाला पकडण्यासाठी चाललेला हा फिल्मी स्टाईल पाठलाग पाहून नागरिकही अवाक् झाले. हा संपूर्ण थरार रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अखेर, अथक पाठलागानंतर ACB च्या पथकाने शेळके यांच्या मुसक्या आवळल्या आणि या पलायननाट्यावर पडदा पडला.

का झाली होती कारवाई?

लाचखोर मारुती शेळके

एका आत्महत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात आरोपीवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात, शेळके यांनी महिला पोलीस अंमलदार मुक्ता लोखंडे यांच्यामार्फत १ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ९५ हजार रुपये स्वीकारताना लोखंडे यांना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात शेळके यांना लाचेस प्रोत्साहन दिल्याबद्दल ताब्यात घेतले होते.

आता या पलायननाट्यामुळे शेळके यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, त्यांच्यावर लाचखोरीच्या गुन्ह्यासोबतच शासकीय ताब्यातून पळून जाण्याचाही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेने पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर आणि प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Video

Previous Post

तुळजापूर सैनिक शाळेवर गंभीर आरोप: आर्थिक गैरव्यवहार आणि विद्यार्थी मारहाणीच्या चौकशीची शिवसेनेची मागणी

Next Post

संत जनाबाई: एका दासीची असामान्य भक्तीगाथा

Next Post
संत जनाबाई: एका दासीची असामान्य भक्तीगाथा

संत जनाबाई: एका दासीची असामान्य भक्तीगाथा

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

July 28, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

July 28, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

July 28, 2026
धाराशिवजवळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका

धाराशिवजवळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका

July 28, 2026
वयोवृद्ध दांपत्याला लुटणारे सराईत चोरटे २४ तासांत जेरबंद!

वयोवृद्ध दांपत्याला लुटणारे सराईत चोरटे २४ तासांत जेरबंद!

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!