• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पोलिसात लाचखोरीचा थरार! ‘रक्षकच’ बनले भक्षक; पोलीस निरीक्षक आणि महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

admin by admin
June 25, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई
0
SHARES
3.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सामान्यांनी न्यायासाठी कोणाकडे पाहावे, हा प्रश्न पडावा अशीच एक घटना आज धाराशिवमध्ये उघडकीस आली आहे. मुलाला गुन्ह्यात मदत करण्याच्या नावाखाली एका असहाय्य आईकडे चक्क १ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला आणि त्याच्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा किडलेला चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती निवृत्ती शेळके (वय ५४) आणि त्याच पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक मुक्ता प्रकाश लोखंडे (वय ३४) अशी या लाचखोर जोडीची नावे आहेत.

लाचखोर मारुती शेळके

लाखाची मागणी, ९५ हजारांवर सौदा

एका ४८ वर्षीय महिलेच्या मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी या दोघांनी तिच्याकडे तब्बल १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मुलाच्या चिंतेने ग्रासलेल्या त्या माऊलीने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

एसीबीने तक्रारीची खातरजमा करण्यासाठी सापळा रचला. आज, २५ जून रोजी, तक्रारदार महिला पोलीस निरीक्षक शेळके यांना भेटल्या असता, त्याने चलाखीने तिला महिला कर्मचारी मुक्ता लोखंडे यांच्याशी बोलण्यास सांगितले. लोखंडे यांनी तक्रारदार महिलेशी बोलणी करून सौदा पक्का केला. लाचेची रक्कम १ लाखावरून ९५ हजार रुपयांवर आणण्यात आली आणि ती आजच धाराशिवच्या शासकीय विश्रामगृहात स्वीकारण्याचे ठरले.

विश्रामगृहाबाहेर ‘आराम’ हराम झाला!

एसीबीच्या पथकाने शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात अत्यंत गुप्तपणे सापळा लावला. ठरल्याप्रमाणे, मुक्ता लोखंडे यांनी तक्रारदार महिलेकडून ९५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना महिला पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. क्षणातच वर्दीचा माज आणि पैशांची मस्ती उतरली आणि हातात पडल्या त्या बेड्या!

पोलीस निरीक्षक मारोती शेळके यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या विविध कलमांनुसार आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईत दोघांच्या अंगझडतीत एकूण तीन मोबाईल फोन, एक मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांचे विश्लेषण सुरू आहे. यातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे धाराशिव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ACB चे आवाहन: लाच मागितल्यास घाबरू नका, आम्हाला कळवा!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी पैशांची मागणी करत असल्यास, न घाबरता तात्काळ टोल-फ्री क्रमांक १०६४ वर किंवा धाराशिव कार्यालयाच्या ०२४७२- २२२८७९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल.

Previous Post

मुरुम: कंटेकुर येथे दिवसा घरफोडी, ३९ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

धाराशिव पोलिसांतील लाचखोरीचे बिंग फुटले! रक्षकच निघाले भक्षक

Next Post
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

धाराशिव पोलिसांतील लाचखोरीचे बिंग फुटले! रक्षकच निघाले भक्षक

ताज्या बातम्या

जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

April 27, 2026
धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

जयंती मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट; पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

April 27, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

घरासमोर का बसलात विचारत ६५ वर्षीय वृद्धेला जातीवाचक शिवीगाळ अन् बेदम मारहाण

April 27, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

खाऊ आणण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; कळंब तालुक्यातील संतापजनक घटना

April 27, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पवनचक्की प्रकल्पातून तब्बल साडेचौदा लाखांच्या केबलची चोरी; उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शिवारातील घटना

April 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group