धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोडे वाढले आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी पोलीस गस्त घालत असताना, दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन आरोपीना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढुन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, पोहेकॉ/327 विनोद जानरव, पोहेकॉ/530 निंबाळकर, पोहेकॉ/1003 वाघमारे, पोहेकॉ/1166 सय्यद, पोना/ 1611 जाधवर, पोना/1479 जाधवर, पोकॉ/1819 अरसेवाड, चालकपोकॉ/564 किंवडे यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढात पेट्रोलिंग करत असताना दि. 16.04.2024 रोजी22.10 वा. सु. साळुंके नगर पाटीजवळ धाराशिव येथे आले असता पाटीजवळ अंधारामध्ये रोडच्या बाजूस एक राखाडी रंगाची मारुती इको व्हॅन संशईतरीत्या आंधाराचा दबा धरुन बसलेले दिसून आल्याने पथाकाने गाडीजवळ जावून पाहीले असता गाडीतील तीन इसम हे तोडांला मास्क व रुमाल बांधलेले असल्याचे दिसून आले .
पोलीस पथकास त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव- 1) शंकर भैरु चव्हाण, वय 30 वर्षे, 2) सुरेश भैरु चव्हाण, वय 42 वर्षे दोघे र.,मोघा बी. ता. आळंद जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक, 3)कालीदास राम काळे, वय 57 वर्षे, रा. मालवानी मलाड अंबोजोवाडी आझादनगर मुंबई हा.मु. केमवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव असे सागिंतले. पथकाने त्यांचे ताब्यातून एक राखाडी रंगाची मारुती इको या कंपनीची कार क्र एमएच 47 एएन9619, एक लोखंडी कुह्राड, लाकडी दांडे, एक लोखंडी पक्कड,स्क्रु ड्रायव्हर, एक हेक्सॉ ब्लेड,तोंडाला बांधण्या करीता वापरलेले मास्क, व हातरुमाल असो एकुण 5,00,000₹ असा मुद्देमाल जप्त केला. तसेच पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद तीन आरोपीस मालासह धाराशिव शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.
तीन मोटरसायकलसह एक आरोपीला अटक
पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, लक्ष्मी नगर ता. भुम येथील युवराज सुखदेव ओव्हळ यांच्या कडे एक चोरीची हिरो होंन्डा मोटरसायकल असुन तो सध्या आठवडी बाजार भुम येथे आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लागलीच आठवडी बाजार येथे जावून आरोपीचा शोध घेत असताना एका इसम पथकास पाहून पळून जत असताना पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- युवराज सुखदेव ओव्हाळ, वय 35 वर्षे, रा.लक्ष्मी नगर भुम ता. भुम जि. धाराशिव असे सागिंतले व त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मी गेल्या काही दिवसात भुम, वाशी येथुन मोटरसायकल चोरी केल्या आहे. अशी कबुली दिल्यावरुन नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या 3 ,मोटरसायकल एकुण 01,05,000₹ किंमतीच्या जप्त करुन त्याची खात्री करता त्या मोटरसायकल पोलीस ठाणे भुम गुरंन 228/2018, कलम 379, वाशी पोलीस ठाणे गुरनं 114/2024 कलम 379, गुरनं115/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. तसेच पोलीसांनी त्याच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस चोरीच्या 3 मोटरसायकलसह भुम पोलीसांच्या ताब्यात दिले.
10 वर्षाखाली गुन्हा करुन फरार झालेला आरोपी गजाआड
पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे परंडा गुरनं 105/2013 कलम 394 भा.द.वि.सं गुन्ह्यातील फरार आरोपी नामे- मच्छिंद्र शामराव पवार हा सध्या सोनगीरी येथे लपून बसला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने लगलीच सोनगीरी येथे जावून आरोपीचा शोध घेवून नमुद आरोपीस दि. 17.04.2024 रोजी ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव मच्छिंद्र शामराव पवार, वय 35 वर्षे, रा. भुम ता. भुम जि. धाराशिव असे सागिंतले तसेच पथकाने नमुद आरोपीस परंडा पोलीसांच्या ताब्यात दिले.