धाराशिव :आरोपी नामे- 1)संतोष तानाजी गोरे, रा. राघुचीवाडी ता. जि. धाराशिव, 2) सय्यदमन्सुर अली अहमद अली रा. धाराशिव इतर दोन यांनी दि. 29.08.2023 रोजी 11.00 ते दि. 14.09.2023 रोजी वा. सु. नगर परिषद शाळा धाराशिव, प्रदीप हॉटेल व रामानंद हॉटेल धाराशिव येथे फिर्यादी नामे- अनंतकुमार बंडुपंत घाटेराव, वय 51 वर्षे, रा. दत्तनगर धाराशिव यांना व त्यांचे सहकारी यांना नमुद आरोपींनी तुम्ही महादेव कोळी या जातीचे बोगस जात प्रमाणपत्र जोडून नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला आहात असे म्हणून जर तुम्हाला नोकरी करयाची असेल तर तुम्ही चौघांनी मला अडीच लाख प्रमाणे एकुण दहा लाख रुपये मला द्या अशी पैशाची मागणी करुन शिवीगाळ करुन पोलीसात तक्रार दिली तर जिवे मारुन टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनंतकुमार घाटेराव यांनी दि.18.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 384, 385, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
परंडा :आरोपी नामे- 1) शरद राजेंद्र करडे, 2) तुकाराम राजेंद्र करडे, 3) राजेंद्र गोवर्धन करडे, 4) राधा राजेंद्र करडे, सर्व रा. बोडका ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 15.11.2023 रोजी 08.30 वा. सु. बोडका येथे फिर्यादी नामे-श्रीरंग गोरख करडे, वय 65 वर्षे, रा. बोडका ता. परंडा जि. धाराशिव यांना नोटीस पाठवण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी रॉड, लाकडी काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीची पत्नी व मुलगी मंजु गोरख बांधवान या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- श्रीरंग करडे यांनी दि.18.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नुकसान करणे
येरमाळा : फिर्यादी नामे-बारीक तुळशीराम डोंगरे, वय 57 वर्षे, रा. सातेफळ ता. कळंब जि. धाराशिव यांचे सातेफळ शिवारातील शेत गट नं 210 मधील ज्वारीच्या कडब्याच्या गंजीला दि. 17.11.2023 रोजी 18.45 वा. सु. अज्ञात व्यक्तीने आग लावून बारीक डोंगरे यांचे 35,000₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- बारीक डोंगरे यांनी दि.18.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 435 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.