• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

धाराशिव भाजप 'कुरुक्षेत्र' नवा अंक: 14

admin by admin
August 25, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

Version 1.0.0

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव भाजपमधील ‘राणा प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा नवा बिझनेस मॉडेल आता पक्षातल्याच जुन्या आणि निष्ठावंत नगरसेवकांच्या जिवावर उठला आहे. बाहेरून येणाऱ्यांसाठी ‘रेड कार्पेट’ आणि घरातल्या निष्ठावंतांना ‘उपाशी’ ठेवण्याचा साहेबांचा (आमदार राणा पाटील) आणि भावी खासदारांचा (मल्हार पाटील) डाव आता त्यांच्यावरच बूमरँग होऊ लागला आहे. त्यातच १ कोटींच्या घोडेबाजाराची चर्चा आणि तुळजापूरच्या नगराध्यक्षांनी टाकलेला व्हॉट्सॲप बॉम्ब, यामुळे साहेबांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे!

‘ऑपरेशन लोटस’ पार्ट-२: १ कोटींचा ‘रेट’ लिक अन् वाटेतूनच यू-टर्न!

चार दिवसांपूर्वी कळंबमधील ठाकरे गटाचे ९ नगरसेवक फोडल्यानंतर साहेबांचा कॉन्फिडन्स एकदम सातव्या आस्मानावर गेला होता. लगेचच ‘ऑपरेशन लोटस’चा पार्ट-२ प्लॅन करण्यात आला. धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या ७ पैकी ४ नगरसेवकांना गळाला लावण्यात आले. हे चारही जण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गाडीत बसून थेट मुंबईला निघाले होते!

पण थांबा, पिक्चरमध्ये इथंच मोठा ट्विस्ट आला! हे नगरसेवक वाटेत असतानाच, मीडियात आणि राजकीय वर्तुळात या ‘घोडेबाजाराचा रेट’ अचानक लिक झाला. “एका नगरसेवकाला १ कोटी रुपये!” अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली. बदनामीच्या भीतीने आणि डील उघडकीस आल्याने, या नगरसेवकांच्या गाडीने वाटेतूनच ‘यू-टर्न’ घेतला आणि प्रवेश चक्क लांबणीवर पडला! आता मार्केटमध्ये अशी हवा आहे की, हे चार नगरसेवक ‘भाव’ न पटल्यामुळे किंवा बदनामीमुळे दुसऱ्याच पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत.

घरच्यांना उपाशी, बाहेरच्यांना तुपाशी!

तिकडे मुंबईच्या वाटेवर १ कोटींच्या रेटची चर्चा सुरू असताना, इकडे धाराशिव आणि तुळजापूरमधील मूळ भाजप नगरसेवकांच्या डोळ्यांतून मात्र पाणी येत होते! नगरसेवकांची खदखद अशी आहे की, “दुसऱ्या पक्षातले नगरसेवक फोडण्यासाठी साहेबांकडे खोकेच्या खोके आणि लाखो रुपये मोजायला आहेत, पण गेल्या सहा महिन्यांत आमच्या हातात विकासाचा एक ‘छदाम’ (दमडी) सुद्धा पडलेला नाही!”

सगळी मलाई आणि रेड कार्पेट फक्त बाहेरून येणाऱ्या ‘आयारामांसाठी’ आणि जे पक्षाशी एकनिष्ठ राहून निवडून आले, त्यांच्या वाट्याला फक्त सतरंज्या आणि कोरडी आश्वासने? या भेदभावामुळे नगरसेवकांचा संताप आता अनावर झाला आहे.

१४० कोटींचा मलिदा फक्त साहेबांच्या ‘लाडक्या’ कंत्राटदारांना!

या नाराजीचे दुसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे ‘टेंडर’चे राजकारण! धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही नगरपालिकेत सध्या भाजपचीच सत्ता आहे. पण सत्तेचा मलिदा मात्र फक्त साहेबाच्या खिशात जात आहे.

  • धाराशिवचा फॉर्म्युला: शहरात तब्बल १४० कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. पण हे काम कुणाला मिळाले? तर राणा पाटलांच्या एकाच ‘लाडक्या’ कंत्राटदाराला!

  • तुळजापूरचा फॉर्म्युला: तुळजापूर शहरातील मोठी कामे कुणाला दिली? तर तीही थेट छत्रपती संभाजीनगरमधील एका कंत्राटदाराला, जो योगायोगाने साहेबांचा दुसरा ‘लाडका’ आहे!

सर्व मलाईदार टेंडर्स फक्त साहेबांच्या लाडक्यांच्या घशात जात असल्याने, स्थानिक भाजप नगरसेवकांनी करायचं काय? केवळ बघ्याची भूमिका घ्यायची का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

नगराध्यक्ष पिटू गंगणे यांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

हा सगळा अन्याय सहन करण्यापलीकडे गेल्यावर, आता तुळजापूरमधून बंडाचा पहिला अधिकृत ‘बॉम्ब’ फुटला आहे. तुळजापूरचे भाजप नगराध्यक्ष पिटू ऊर्फ विनोद गंगणे यांनी आपल्या व्हॉट्सॲपवर एक अतिशय सूचक आणि खळबळजनक स्टेटस ठेवले— “आमचं ठरलंय!”

राजकारणात ‘आमचं ठरलंय’ या एका वाक्याचा अर्थ किती भयंकर असू शकतो, हे साहेबांना नव्याने सांगण्याची गरज नाही. गंगणे यांच्या या एका स्टेटसने राणा गटाच्या पायाखालची वाळू सरकवली आहे. तुळजापूरचे भाजप नगरसेवक आता थेट राणा पाटलांवर दबाव आणत असून, “आमची कामे द्या, नाहीतर आमचा मार्ग मोकळा आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

थोडक्यात सांगायचे तर, विकत घेतलेल्या नव्या शिलेदारांच्या आनंदात साहेब मग्न असताना, त्यांच्या स्वतःच्याच घरात (तुळजापूर आणि धाराशिवमध्ये) बंडाचा ज्वालामुखी फुटण्याच्या बेतात आहे. आता नगराध्यक्षांचे ‘काय ठरलंय?’ हे पाहणे संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्वात मोठा राजकीय सस्पेन्स ठरणार आहे!

Previous Post

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026

Recent Posts

  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!