• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शिक्षणाधिकारी ॲक्शन मोडमध्ये; अभिनव इंग्लिश स्कूलच्या चौकशीसाठी समिती गठीत

धाराशिव लाइव्हचा दणका

admin by admin
June 18, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!
0
SHARES
2.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरातील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला फी भरण्यास उशीर झाल्याने अपमानास्पद वागणूक देऊन शाळेतून घरी पाठवल्याप्रकरणी पालकाने केलेल्या तक्रारीची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली असून, समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.धाराशिव लाइव्हने याबाबत बातमी प्रकाशित केली होती.

अर्जदार सचिन हरिश्चंद्र मोरे यांनी १७ जून २०२५ रोजी शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांची मुलगी वेदिका सचिन मोरे, अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे.  शाळेची फी भरण्यास विलंब झाल्याने शाळा व्यवस्थापनाने श्री. मोरे यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून फी भरण्याची सूचना दिली होती. त्यावेळी त्यांनी १८ जून २०२५ रोजी फी भरण्याचे आश्वासन दिले होते. 

असे असतानाही, त्यांची मुलगी वेदिका हिला अपमानास्पद वागणूक देऊन वर्गाच्या बाहेर काढण्यात आले आणि तिला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले, असे मोरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देता येत नाही, असे असतानाही शाळेने असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने कारवाई केली आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांनी उपशिक्षणाधिकारी के. आर. पिकवणे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.  या समितीत विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम आणि विस्तार अधिकारी सविता कुंभार यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. 

सदर समितीला १८ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाची चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  या चौकशी अहवालानंतर पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या प्रती माहितीस्तव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लातूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. 

धाराशिव : अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये फीसाठी विद्यार्थिनीचा अपमान; पालकाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव

Previous Post

९३ वर्षांचं प्रेम, सोनं-नाणं फिकं पाडणारा प्रामाणिकपणा; डोळ्यात पाणी आणणाऱ्या आजोबा-आजींच्या व्हायरल व्हिडिओची गोष्ट!

Next Post

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा; आता जिल्हास्तरीय समितीच्या हाती अंमलबजावणीची धुरा

Next Post
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा; आता जिल्हास्तरीय समितीच्या हाती अंमलबजावणीची धुरा

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन धाडसी चोरी!

July 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर बायपासवर पोलिसांची मोठी कारवाई! एक्सयुव्ही ५०० कारमधून चाललेली २०० किलो गोवंशीय मांसाची तस्करी उधळली

July 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंबमध्ये भररस्त्यात थरार! देशमुख हॉस्पिटलसमोर तरुणावर दगडाने प्राणघातक हल्ला

July 17, 2026
वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

वारी मोजायची नसते, वारी पेरायची असते!

July 17, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना; दागिने, रोकड व दोन कालवडी लंपास

July 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group