धाराशिव : फिर्यादी नामे-विनायक अदिनाथ डोईफोडे, वय 59 वर्षे, रा. सुर्डी ता. बार्शी, जि. सोलापूर यांची अंदाजे 8,00,000₹ किंमतीची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ कार क्र एमएच 13 डीवाय 1374 जिचा इंजिन नं XMN4D19977 व चेसी नं MA1TA2XM2L2E49604 ही दि. 30.04.2024 रोजी 13.30 ते 14.15 वा. सु. एमएसईबी ऑफीसचे उजव्या बाजूला असलेल्या सभेच्या पार्कींगमधुन धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विनायक डोईफोडे यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-शुभांगी बिभिषण बनसोडे, वय 33 वर्षे, रा.बिपीन स्मृती सोसा इमारत क्र 006 तळमजला, प्श्रतिक्ष नगर सायना कोळीवाडा मुंबई या दि. 30.04.2024 रोजी 11.15 ते 11.45 वा. सु. श्री. तुळजाभवानी देव दर्शनासाठी तुळजापूर येथे रांगेत उभा असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून शुभांगी यांच्या पर्स मधील रोख रक्कम 25,200₹ व महत्वाचे कागदपत्रे पर्स सहीत चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शुभांगी बनसोडे यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.