येरमाळा : आरोपी नामे-1)जितेंद्र दत्तु पवार, वय 35 वर्षे, रा. वडगाव ज, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 17.30 वा. सु. वडगाव ज. येथे मयत नामे- दत्तु शाहु पवार, वय 60 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव यांना शेती चे वादाचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन चाकुने छातीच्या डावे बाजूस मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. व मयताची पत्नी तारामती दत्तु पवार ही भांडण सोडवण्यास आली असता त्यासही नमुद आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे- आकाश दत्तु पवार, वय 28 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 302, 307, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे चार गुन्हे दाखल
अंबी : आरोपी नामे-1)हनुमंत नारायण गाढवे, 2) तेजस हणुमंत गाढवे, 3) सर्जेराव हौसेराव गाढवे, 4) सतिश सर्जेराव गाढवे सर्व रा. देउळगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 06.30 वा. सु. देवुळगाव शिवार येथील शेत गट नं 111 मध्ये फिर्यादी नामे- नामदेव लिंबराज गाढवे, वय 24 वर्षे, रा. देउळगाव ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत मोजण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नामदेव गाढवे यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे-1)अनिकेत नितीन कांबळे, 2) आदित्य नितीन कांबळे, दोघे रा. कल्पना नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 30.04.2024 रोजी 18.00 वा. सु. गणेश नगर कळंब येथे फिर्यादी नामे- सुरेंद्र महादेव गाडे, वय 35 वर्षे, रा.कल्पना नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना व भावाचा मुलगा-संकेत अनिल गाडे, भाचा- प्रणव ज्ञानोबा टोपे यांना नमुद आरोपींनी फिर्यादीच्या भावाचा मुलगा व भाचा यांना मारहाण केल्याने ते विचारण्यास गेल्याचे कारणावरुन शिवगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुरेंद्र गाडे यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे-1)शशिकांत दासराव फाटक, रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 20.00 वा. सु. फाटक यांची मिलसमोर कळंब ता. कळंब जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे- सुग्रीव बप्पा चौरे, वय 20 वर्षे, रा. तुकुचीवाडी ता. केज जि. बीड हे व चालक फाटक यांच्या मिलवर डीओसी भरण्यासाठी गेले असता नमुद आरोपींनी गाडीचे संपुर्ण पेपेर झेरॉक्स दिल्याशिवाय गडी बाहेर काढता येणार नाही असे म्हणून नमुद आरोपीने महादेव चौरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यासही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुग्रीव चौरे यांनी दि.29.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : आरोपी नामे-1)दत्तु शाहु पवार, रा. वडगाव ज,ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 06.30 वा. सु. वडगाव येथे फिर्यादी नामे- जितेंद्र दत्तु पवार, वय 34 वर्षे, रा. वडगाव ज, ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने चोराखळी येथील दोन एकर जमीनीचे नुकसान भरपाई व पिक विमा मला दे या कारणावरुन शिवीगाळ करुन कुह्राडीने डावे हातावर मारुपन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जितेंद्र पवार यांनी दि.29.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 324,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.