धाराशिव : आरोपी नामे-1)सचिन अप्पासाहेब विधाते, 2)सागर गोरोबा उर्फ सुरेश विधाते, 3) देवराज बाबासाहेब विधाते, 4) रवि अप्पासाहेब विधाते, 5)अमोल खंडू विधाते, 6) अप्पासाहेब खंडू विधाते, 7) राहुल श्रावन विधाते, 8) अविनाश अमोल विधाते, सर्व रा. शेकापूर ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.01.2024 रोजी 06.30 वा. सु. शेकापूर गावातील जिल्हापरिषद शाळे जवळ भारत विधाते यांचे किरना दुकाना समोर फिर्यादी नामे-विलास बाबु कांबळे, वय 37 वर्षे, रा. शेकापुर साठेनगर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,तलवारीने काठीने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांची भावजय या भांडण सोडवण्यास आली असता त्यांनाही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विलास कांबळे यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 307, 326, 504, 143, 147, 148, 149, 107, 354, 354(अ) भा.दं.वि.सं. सह कलम 4/25 भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) मुन्ना कांबळे, 2) रोहित कांबळे, 3) संकेत कांबळे सर्व रा. शेकापूर ता. जि. धाराशिव यांनी दि.15.01.2024 रोजी दुपारी 04.00 वा. सु. जि.प.शाळेच्या समोरील रोडव्र शेकापूर येथे फिर्यादी नामे- कुमार आप्पा विधाते, वय 22 वर्षे, रा. शेकापूर ता. जि. धाराशिव हे धाराशिव येथुन गावी शेकापुर येथे आले असता नमुद आरोपींनी ‘तुला लय माज आलाय का’ थांब तुला दाखवतो असे म्हाणून फिर्यादीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व त्यांचे वडील, भाउ व चुलते हे यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मरण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कुमार विधाते यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 307, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा :आरोपी नामे-विनोद वसंत पवार, वय 30 रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. पुणे यांनी दि.13.01.2024 रोजी 20.00 वा. सु. अर्जुन कोंडीराम पवार यांचे घरा समोर पानगाव येथे फिर्यादी नामे-अशोक विनायक पवार, वय 33 वर्षे, रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गावातील शालेय शिक्षण व्यवस्थापन समीतीच्या निवडणुकीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कुमार विधाते यांनी दि.15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.