• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

एकाच घटनेत दोन गुन्हे दाखल करणे भोवले; तुळजापूरचे तत्कालीन सपोनि भालेराव यांना दोन हजार दंड

कर्तव्यात अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार वर्तनाचा ठपका; प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी दिले होते चौकशीचे आदेश

admin by admin
October 30, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
एकाच घटनेत दोन गुन्हे दाखल करणे भोवले; तुळजापूरचे तत्कालीन सपोनि भालेराव यांना दोन हजार दंड
0
SHARES
2.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: एकाच घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करणे आणि बेकायदेशीर अटक करणे तुळजापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) टी. आर. भालेराव यांना चांगलेच भोवले आहे . याप्रकरणी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सपोनि भालेराव यांच्यावर ‘कर्तव्यात अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व अशोभणीय वर्तन’ केल्याचा ठपका ठेवत २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अभिषेक राजेंद्र माने यांच्या कुटुंबाविरुद्ध श्रीमती भाग्यश्री किरण इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ११ जून २०२४ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात एनसीआर नं. ४९६/२०२४ (कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही, सपोनि भालेराव यांनी तीन दिवसांनी, १४ जून २०२४ रोजी, त्याच घटनेप्रकरणी श्री. माने यांच्या कुटुंबियांविरुद्ध गु.र.नं. २५५/२०२४ (कलम ३०८, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि) प्रमाणे दुसरा गुन्हा दाखल केला.

अशा प्रकारे एकाच घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाच्या अर्णेश कुमार विरुद्ध बिहार राज्य’ (२०१४) या खटल्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असताना , सपोनि भालेराव यांनी अर्जदारास बेकायदेशीर अटक करून कायद्याचे उल्लंघन केले. 

या प्रकरणाची दखल घेत तुळजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी खात्यांतर्गत चौकशी करून शिक्षा देण्याबाबत आदेशित केले होते. तसेच, अभिषेक माने यांनी देखील २० मे २०२५ रोजी याबाबत तक्रारी अर्ज दिला होता. 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशीअंती, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम आदेश जारी केला. यात सपोनि टी. आर. भालेराव (सध्या नेमणूक पोलीस ठाणे येरमाळा) यांना कर्तव्यात बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे वर्तन केल्याबद्दल मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम, १९५६ मधील तरतुदीनुसार २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Previous Post

सत्तेचा ‘अहंकार’ अन् धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’!

Next Post

आमदार-पालकमंत्र्यांच्या वादात १४० कोटींची रस्ते कामे रखडली; धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा ‘रास्ता रोको’

Next Post
आमदार-पालकमंत्र्यांच्या वादात १४० कोटींची रस्ते कामे रखडली; धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा ‘रास्ता रोको’

आमदार-पालकमंत्र्यांच्या वादात १४० कोटींची रस्ते कामे रखडली; धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा 'रास्ता रोको'

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group