• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या

 दोन मोटारसायकलींसह दीड लाखांची कॉपर केबल लंपास

admin by admin
April 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
109
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  जिल्ह्यातील कळंब, लोहारा आणि वाशी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दोन मोटारसायकली आणि एका पवनचक्कीमधील सुमारे दीड लाख रुपयांची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या तिन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ५ एप्रिल रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रायगव्हाण येथून मोटारसायकल चोरी:

कळंब तालुक्यातील रायगव्हाण येथील अरुण बलभिम गिराम (वय ३६ वर्षे) यांची होंडा शाईन कंपनीची, गजगा रंगाची, पासिंग नंबर नसलेली मोटारसायकल (अंदाजे किंमत ७५,००० रुपये) २९ मार्च २०२५ रोजी रात्री ९ ते ३० मार्च २०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी अरुण गिराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोहारा येथून मोटारसायकल चोरी:

लोहारा शहरातील मणियार मोबाईल शॉपीसमोरून हमीद राजबखॉ पठाण (वय ४८ वर्षे, रा. भंडारी) यांची एमएच १३ सीसी २४२६ क्रमांकाची मोटारसायकल (अंदाजे किंमत २०,००० रुपये) २८ मार्च २०२५ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी हमीद पठाण यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विजोरा शिवारातून कॉपर केबल चोरी:

वाशी तालुक्यातील विजोरा शिवारातील रिन्यू पॉवर कंपनीच्या १९ क्रमांकाच्या पवनचक्कीमधून अज्ञात व्यक्तीने १६२ फूट लांबीची कॉपर केबल (अंदाजे किंमत १,५१,१४० रुपये) चोरून नेली. ही घटना १६ मार्च २०२५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कंपनीचे प्रतिनिधी अमोल अश्रुबा मोटे (वय ४० वर्षे, रा. गिरवली, ता. भूम) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

तिन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचे गुन्हे दाखल केले असून, अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

आर्थिक वादातून तरुणाला काठी, पाईपने मारहाण

Next Post

जिल्हा नियोजन कामांना स्थगितीवरून आता महायुतीतच फाटाफूट?

Next Post
जिल्हा नियोजन कामांना स्थगितीवरून आता महायुतीतच फाटाफूट?

जिल्हा नियोजन कामांना स्थगितीवरून आता महायुतीतच फाटाफूट?

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात तरुणाला लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण! जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!