बेंबळी : फिर्यादी नामे-दत्तात्रय लिंबाजी जाधव, वय 67 वर्षे, रा. चिखली ता. जि. धाराशिव यांचे राहात्या घराला कुलूप लावून शेड जवळील कोट्यामध्ये झोपले असता त्यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तींने दि. 20.03.2024 रोजी 22.30 ते दि. 21.03.2024 रोजी 05.00 वा. सु. चावीने उघडून आत प्रवेश करुन कपाटातील 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन व रोख रक्कम 4,000 असा एकुण 86,000₹ किंमतीचा माल चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे दत्तात्रय जाधव यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : फिर्यादी नामे-शत्रुघ्न बाबुराव सुरवसे, वय 45 वर्षे, रा. सुंदरवाडी पाटी, सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहात्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तींने दि. 26.03.2024 रोजी 00.30 ते 05.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 38 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल फोन व रोख रक्कम 42,000 असा एकुण 1,66,000₹ किंमतीचा माल चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शत्रुघ्न सुरवसे यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : फिर्यादी नामे-अमीन इब्राहीम शेख, वय 70 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव यांचे जेवळी शिवारातील शेत गट नं 257 मधील ज्वारीचे अंदाजे 52,000₹ किंमतीचे ज्वारी व कडबा हे दि. 16.03.2024 रोजी 06.00 ते दि. 20.03.2024 रोजी 17.00 वा. सु. आरोपी नामे- विश्वनाथ हानमंत हावळे, 2) शामल विश्वनाथ हावळे, 3) रामेश्वरी अरविंद कासेगावे, 4) शिल्पा श्रीशैल हावळे सर्व रा. जेवळी उ ता. लोहारा जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अमीन शेख यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 379, 447, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-बाळासाहेब दत्तात्रय दरेकर, वय 56 वर्षे, रा. आरळी खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राशन दुकानात ठेवलेले ई पॅश थंब मशीन अंदाजे 13,500 ₹ किंमतीची ही दि. 29.01.2024 रोजी 10.00 ते 16.00 वा. सु. आरळी खुर्द येथुन आरोपी नामे-सुदर्शन दत्तात्रय सोमवंशी रा. आरळी खु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे बाळासाहेब दरेकर यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल
परंडा :आरोपी नामे-1)शिवाजी संतराम कोकाटे, वय 45 वर्षे, 2) शंकुतला शिवाजी कोकाटे, वय 40 वर्षे, 3) लक्ष्मण शिवाजी कोकाटे, वय 16 वर्षे, 4) रामा शिवाजी कोकाटे सर्व रा. कुंभेजा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2010 रोजी 15.00 वा. सु. त्या पुर्वीपासुन साक्षीदार नं 4 व 6 यांच्या कार्यालयात व खानापुर येथे जमीन गट नं 78/अ मध्ये फिर्यादीचे शेत व घर सोडून पळून जावे व त्यांना आर्थिक व मानसिक त्रास व्हावा या हेतुन त्यांच्या विरुध्द साक्षीदार यांची दिशाभुल करुन त्यांनी खोटी माहिती पुरवून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली. यावरुन मा. न्यायालयाचे जा क्र/ फौ. अ/55/2024 अतिरिक्त सत्र न्यायालय परंडा यांनी दिलेल्या एम केस वरुन फिर्यादी नामे अरुण दशरथ परिहार, वय 45 वर्षे रा. खानापुर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.26.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 420, 427, 465, 34 भा.दं.वि.सं.सह अ.जा.ज.अ.प्र कलम 1(1)(iv)(v)(viii)(ix)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.