• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; दोन मोटारसायकलींसह बांधकाम साहित्य लंपास

admin by admin
August 1, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
98
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मोटारसायकली आणि हजारोंच्या किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले आहे. या सर्व घटनांसंदर्भात ३१ जुलै रोजी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नळदुर्ग: घरासमोरून मोटारसायकल चोरीला

नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलगरा (ता. तुळजापूर) येथील महेश तुकाराम सोनवणे (वय २६) यांची ४०,००० रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.वाय. ६०३३) घरासमोरून चोरीला गेली. २५ जुलै रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

तुळजापूर: बसस्थानकातून दुचाकी लंपास

दुसरी घटना तुळजापूर शहरात घडली. येथील शिवरत्न नगरचे रहिवासी असलेले बालाजी बाबुराव ढवन (वय ५५) यांची ३०,००० रुपये किमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ ए.एन. ९३२२) जुने बसस्थानक परिसरातून २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. याप्रकरणी बालाजी ढवन यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा: बांधकाम साहित्यावर डल्ला

उमरगा शहरातील जिजाऊ चौक परिसरात राहणारे प्रदीप गुलाबराव भोसले (वय ४५) यांच्या घराच्या बांधकामावरील साहित्य चोरीला गेले आहे. ३० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तींनी १५,४०० रुपये किमतीचे साहित्य चोरले. यामध्ये २०० किलो सळईचे तुकडे, बायडिंग तार आणि खिळे यांचा समावेश आहे. याप्रकरणी उमरगा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

एकाच दिवशी जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल झाल्याने चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस या सर्व प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव तालुक्यातील खेडमध्ये किराणा दुकानावर छापा, ९ हजारांहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

Next Post

धाराशिव सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; APK फाईलद्वारे फसवणूक झालेल्या गृहिणीचे १.९९ लाख रुपये परत मिळवले

Next Post
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; APK फाईलद्वारे फसवणूक झालेल्या गृहिणीचे १.९९ लाख रुपये परत मिळवले

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!