तामलवाडी – गुटख्याच्या गोण्या घेऊन हुमानाबाद येथून आलेला आणि सोलापूरच्या दिशेला जाणारा ट्र्क तामलवाडी पोलिसांनी पकडून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पण मुख्य तस्कर नकुल पंडितच्या मुसक्या कधी आवळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे.
दि.24.02.2024 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, एक मालवाहु ट्रक क्र एमएच 43 यु 1523 यामध्ये अवैध गुटखा वाहतुक करीत तुळजापूर कडून सोलापूरच्या दिशेने जात आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून समोरुन येणारे ट्रक क्र एमएच 43 यु 1523 हा थांबवून चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा मिळून आला. सदर वाहनाचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव समीर सरवर पाशा, वय 26 वर्षे, रा. दुबलगुंडी ता. हुमनाबाद जि. बिदर राज्य कर्नाटक असे सागिंतले
. त्यावर पथकाने सदर ट्रक व त्यातील मिळून आलेला 1) बादशहा कंपीनचा गुटखा एकुण 40 मोट्या गोण्या 15360 पॉकीटे अंदाजे 18,43,200 ₹ किंमतीचा माला सह ट्रक क्र एम.एच. 43 यु 1523 असा एकुण 28,43,200 ₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी नामे- समीर सरवर पाशा, वय 26 वर्षे, रा. दुबलगुंडी ता. हुमनाबाद जि. बिदर राज्य कर्नाटक यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुरनं 30/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 सह कलम 26(2)(i),26(2)(iv),27(3)(e), 30(2), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार हे करत आहे.