तुळजापूर : आरोपी नामे-1)विनायक विश्वास इंगळे, रा. वेताळ नगर तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 10.05.2024 रोजी 12.00ते 12.30 वा. सु. विश्वनाथ कॉर्नर येथील ओम वडापाव दुकानासमोर आंबेडकर चौक येथे जाणारे रोडवर तुळजापूर येथे फिर्यादी नामे-प्रमोद लक्ष्मण दाणे, वय 32 वर्षे, रा.जिजामाता नगर, मारुती मंदीराजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन डिझेल अंगावर टाकुन काडीपेटीतील काडी ओढून आग लावून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रमोद दाणे यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 307, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : आरोपी नामे-1)बजरंग उर्फ नारायण मारुती ताकमोडे, 2) सतिश बापू हगारे,3) दत्ता मारुती ताकमोडे, 4) गोपीनाथ मधु हगारे, 5) सधु बापु जेकटे, 6) बिरुदेव भानुदास जेकटे, 7) काशिनाथ मधु हगारे, 8) बाळु लक्ष्मण शिंगाडे, 9) नाना वायसे सर्व रा. ताकमोडवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 08.05.2024 रोजी 20.30 वा. सु. ताकमोडवाडी येथे फिर्यादी नामे- शेषनाथ लिंबा भोसले, वय 39 वर्षे, रा. ताकमोडवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तुझा चुलत भाउ नकुल भोसले याची पत्नी पळून गेल्याची केस पोलीस स्टेशनला करायची नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी मनिषा व मुली स्वाती, नेहा चुलत भाउ नकुल भोसले हे भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शेषनाथ भोसले यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506,143, 147, 149, भा.दं.वि.सं. अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(2)(व्हिए), 3(1) (आरएस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : आरोपी नामे-1)विकास विठ्ठल इंगळे, 2) मयुर विकास इंगळे, रा. बोरवंटी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 09.05.2024 रोजी 13.30 वा. सु. बोरवंटी शेत शिवार येथे फिर्यादी नामे- अशोक विठ्ठल इंगळे, वय 56 वर्षे, रा. बोरवंटी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक इंगळे यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरोपी नामे-1)बालाजी शिवपाल रजपुत, 2) नितीन बालाजी रजपुत, 3) शिवपाल माणिक रजपुत सर्व रा. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 07.05.2024 रोजी 22.30 वा. सु. उत्तर जेवळी येथे फिर्यादी नामे- मंगल दत्ता रजपुत, वय 35 वर्षे, र. उत्तर जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव यांना शेत वाटणीचे कारणावरुन शिवीगाळ करुन काठीने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीची सासु या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मंगल रजपुत यांनी दि.10.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : आरोपी नामे-1)रेवन भोसले, 2) शेषेराव भोसले, 3) देवन भोसले, 4) मनिषा भोसले, सर्व रा. ताकमोडवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 08.05.2024 रोजी 18.00 वा. सु. ताकमोडवाडी येथे फिर्यादी नामे-नारायण मारुती ताकमोड, वय 40 वर्षे, रा. ताकमोडवाडी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने उचलीचे पैसे बाकी असल्याने ते मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळादाबुन कोयता व चाकुने मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नारायण ताकमोड यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन आंबी पो. ठाणे येथे 307, 341, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-1)तनवीर मुन्ना बागवान, 2) मुसीफ मुक्रम काझी, 3) नावेद महम्मंद कबीर तिघे रा तेर ता. जि. धाराशिव यांनी दि. 07.05.2024 रोजी 16.10 वा. सु. जुनी ग्रामपंचायत कार्यालय येथे व आझाद चौक तेर येथे फिर्यादी नामे-जुनेद उबेद मोमीन, वय 46 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने निवडणुकीचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जुनेद मोमीन यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1)अरविंद महादेव गायकवाड, 2) अनुप अरविंद गायकवाड दोघे रा. वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.05.2024 रोजी 07.30 वा. सु. वडगाव लाख शिवारातील शेत गट नं 254 येथे फिर्यादी नामे-अजीत भरत गायकवाड, वय 32 वर्षे, रा.वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने सामाईक बांधाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीचे वडील भरत लिंबाजी गायकवाड हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींने शिवीगाळ करुन डोक्यात काठीने मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजीत गायकवाड यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1)स्वप्नील भास्कर सरक, 2) प्रभाकर शंकर देवगुंडे, 3) आकाश भोसले, 4) प्रशांत पांडुरंग कानाडे सर्व रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 08.05.2024 रोजी 21.50 वा. सु. शिवाजी नगर काक्रंबा येथे फिर्यादी नामे-भाग्यश्री सदाशिव क्षिरसागर, वय 33 वर्षे, रा. शिवाजी नगर काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना त्यांचे पती सदाशिव क्षिरसागर यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे करणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कत्ती व चाकूने मारहाण करुन जखमी केले. तसेच दरवाजावर दगड मारुन काच व प्लॅस्टीकच्या खुर्च्या फोडून नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भाग्यश्री क्षिरसागर यांनी दि.09.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324,427, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.