धाराशिव :आरोपी नामे-1)दत्ता सुर्यकांत जाधव, रा. इंदीरानगर धाराशिव, 2) हनुमंत राम चौगुले, रा. सांजा रोड धाराशिव, 3) अंबिका दत्ता जाधव, 4) कलावती दत्ता जाधव, रा. इंदीरा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 24.03.2024 रोजी 11.00 वा. सु. इंदिरानगर धाराशिव येथे फिर्यादी नामे- शिवाजी मारुती पवार, वय 40 वर्षे, रा. शिवाजी चौक वडार गल्ली ता.जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बतईने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आई ही भांडण सोडवण्यास आली असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन तिच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र व दिड तोळ्याचे सोन्याचे गंठन काढुन घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शिवाजी पवार यांनी दि.07.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 324, 327, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-1)गोकुळ उर्फ पिनू ज्ञानदेव घाटशिळे, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.04.2024 रोजी आनंदवन हॉटेलवर तुळजापूर येथे फिर्यादी नामे- भैरवनाथ बाळासाहेब घाटशिळे, वय 32 वर्षे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना तु माझे मुलीस मारले आहेस असा संशय घेवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने नमुद आरोपींने त्याचे हातातील किचनला असलेले कटरने गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे भैरवनाथ घाटशिळे यांनी दि.07.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 307, 323, 504, 506, 507 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-अंबादास लक्ष्मण भोसले, 2) गोविंद लक्ष्मण भोसले, 3) काशिनाथ गोविंद भोसले, 4) पण्या बालाजी भोसले सर्व रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 07.04.2024 रोजी 19.00 वा. सु. बालाजी मंडले यांचे चिकनच्या दुकानासमोर तलमोड येथे फिर्यादी नामे-संजय आनंदराव घोडके, वय 42 वर्षे, रा. तलमोड ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तुझ्या भावाने बचत गटाचे पैसे दुसऱ्याला उचलून का दिले या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटरने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे संजय घोडके यांनी दि. 07.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.