धाराशिव: आरोपी नामे-आबा बनसोडे, राजवीर बाळासाहेब बनसोडे, गौरव शिंगाडे, गुलशन कांबळे, राकेश गायकवाड, राकेश बनसोडे, यश उर्फ पिल्लु देवकते सर्व रा. देवकते गल्ली धाराशिव व इतर पाच इसम यांनी दि.02.07.2024 रोजी 16.00 वा. सु. मोहिते गल्ली देशपांडे स्टॅन्ड धाराशिव येथे फिर्यादी नामे-अनिल अशोक आसलेकर, वय 45 वर्षे, रा. मोहिते गल्ली देशपांडे स्टॅन्ड धाराशिव ता. जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा कृष्णा यांना नमुद आरोपींनी मागील भाडंणाच्या कारणावरुन गैरकायदृयाची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, तिक्ष्ण हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिल आसलेकर यांनी दि.02.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 189 (1), 189(2), 189(4), 190, 125, 115(2), 351(2)(3), 352, 118 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-ओम भोपी, ज्योतीराम जाधव, हर्ष सोंजी सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 01.07.2024 रोजी 17.00 वा. सु. सलुन दुकानात कने स्टॉप तुळजापूर येथे फिर्यादी नामे- दादासाहेब बब्रुवान पोपळे, वय 50 वर्षे, रा. जिजामातानगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. दुकानाचे काचावर कोयत्याने मारुन काचा फोडून नुकसान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दादासाहेब पोपळे यांनी दि.02.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 119(1), 118(1), 324(4), 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : आरोपी नामे-राजाभाउ धर्मा पुलावळे, संतोष धर्मराज पुलावळे, सविता संतोष पुलावळे, बाळु धर्मराज पुलावळे, रुक्मिीणी धर्मराज पुलावळे, जनार्धन श्रीपती थोरात, संगीता जनार्धन थोरात, संदीप जनार्धन थोरात, भरत जनार्धन थोरात, संदीप जनार्धन थोरात, भरत जनार्धन थोरात सर्व रा.ईट ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 05.06.2024 रोजी 08.00 ते 08.30 वा. सु. ईट येथे फिर्यादी नामे- शिवाजी एकनाथ थोरात, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी भांडण सोडवण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने, काठी मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी थोरात यांनी दि.02.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.